काका विरुद्ध पुतण्याः बारामतीत विधानसभेची रणधुमाळी, कोण होणार विजयी ?

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

बारामतीच्या राजकारणात मोठी रणधुमाळी रंगणार आहे, कारण आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि त्यांच्या पुतण्या युगेंद्र पवार यांच्यात थेट सामना होणार आहे. काही दिवसांपूर्वी युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी विधानसभेला “पिक्चर” दाखवू, असा इशारा देत अजित पवारांना आव्हान दिलं होतं, आणि आता या आव्हानाला तोंड देण्यासाठी मैदान सजलं आहे.अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. या निर्णयाने जय पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यामुळे विधानसभेची निवडणूक अजूनच महत्त्वाची ठरत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाने युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे, ज्यामुळे हे आव्हान अजूनच रोचक बनलं आहे.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना धक्का बसला असताना सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यामुळे विधानसभेत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार हा सामना अत्यंत महत्वाचा आणि चुरशीचा ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये वाढलेल्या या तणावामुळे बारामतीची निवडणूक पूर्ण राज्याच्या राजकीय नकाशावर केंद्रस्थानी आली आहे. मागील काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीला आपल्या चुलत बहिण सुप्रिया सुळे विरुद्ध उमेदवारी दिली होती. पण सुप्रिया सुळे यांनी आपला गड कायम राखला आणि विजयाचा गुलाल उधळला लोकसभेच्या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मोठी रंगतदार झाली होती. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून महायुती सोबत जोडले होते. आणि त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ आपल्या वाट्याला घेत पत्नीला उमेदवारी देऊन नणंद विरुद्ध बहुजाई असा सामना झाला होता. पण सुप्रिया सुळे यांनी चांगल्या मताधिक्याने आपला गड राखण्यात यशस्वी झाल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होणार आहे. कारण आता अजित पवारांविरुद्ध शरद पवारांनी पुतण्याला काका विरुद्ध उमेदवारी दिलेली आहे.

बारामती ही राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जाते, मात्र या निवडणुकीत कुटुंबातील या दोन नेत्यांमध्ये होणारी थेट लढत नेमकी कोणत्या दिशेने जाईल, याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. युगेंद्र पवार यांना शरद पवार यांच्या पाठिंब्याचा कितपत फायदा होईल आणि अजित पवार आपला जुना बालेकिल्ला कसा राखून ठेवतील, हे पाहणं उत्सुकतेचंठरणार आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">