राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राज्य महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं सोशल मीडिया फेसबुक अकाउंट अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आलेला आहे. त्या अज्ञानता हॅकर्सने मंत्री आदित्य तटकरे यांच्या फेसबुक अकाउंट वर काही अक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्यात आलेले आहेत. या संदर्भातील माहिती मंत्री आदिती तटकरे ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे. या फेसबुक अकाउंट च्या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन पोलिसांमध्ये तक्रार नोंदवलेली आहे. आता पुढील या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
आदित्य तटकरे काय म्हणाल्या आहेत
नमस्कार,
माझं फेसबुक अकाउंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती.
याबाबत मी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्स चा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
तसदीबद्दल क्षमस्व!
सोशल मीडिया अकाउंट्स हॅक होण्याच्या घटनेमध्ये वाढ
सोशल मीडिया अकाउंट जसे की ट्विटर, फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम आदी. सोशल मीडिया अकाउंट हॅक च्या घटना वारंवार वाढत चालल्या आहेत. हॅकर सोशल मीडिया हॅक करून त्या सोशल मीडिया अकाउंट च्या माध्यमाने त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेली व्यक्तींकडून काहीही अडीअडचणी मध्ये असल्याच्या पोस्ट पाठवतात आणि पैसे मागतात काही लोक विश्वास करून पैसे देखील पाठवून देतात. आत्तापर्यंत असे अनेक जणांचे अकाउंट हॅक करून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या कॉन्टॅक्ट मध असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात गड्डा लावलेला आहे. आतापर्यंत अशा अनेक सर्वसामान्य लोकांचे आणि मोठमोठ्या सेलिब्रिटींचे अकाउंट हॅकर्सने हॅक केले आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोकांना गड्डा लावलेला आहे. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याच्या घटना समोर येत आहेत. आणि त्या अकाउंटवर वाईट प्रकारच्य पोस्ट शेअर करत असतात. हॅकर्सची मोठ्या प्रमाणात हिम्मत वाढलेली आहे. कारण ते फक्त आता सर्वसामान्य लोकांचेच नाही तर मोठमोठ्या मंत्र्यांची देखील सोशल मीडियावर असलेले इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप, युट्युब यासारखे अकाउंट हॅक करू लागले आहेत. आदिती तटकरे ह्या मंत्री असून त्यांचेही सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आलं आता त्यावर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. आता पोलिसांना त्या हॅकर्सच्या मुस्क्या आवरण्यात यश मिळतं का याकडे सर्वांचे लक्ष लागू नाही.