एबी फॉर्म मिळाल्यानंतर उन्मेश पाटील भावूक, कुटुंबीयांना आले अश्रू अनावर

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

ठाकरे गटाकडून पहिले उमेदवार ला एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. चाळीसगाव मधील उन्मेश पाटील यांचं तिकीट फिक्स झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे ठाकरे गटाकडून उन्मेश पाटील यांना एबी फॉर्म दिला गेला असल्याची माहिती समोर येत आहे. एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती उमेदवार उन्मेश पाटील यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांना दिलेली आहे. उन्मेश पाटील यांच्या कुटुंबाचे अश्रू प्रसार माध्यमांशी बोलताना अनावर आले होते. उन्मेश पाटील यांच्या अवतीभवती गेल्या काही महिन्यापासून जो खेळ चालू होता. ते सर्व आटवून कुटुंबीयांचे अश्रू अनावर आले होते.

उन्मेश पाटील यांच्या वडिलांनी देखील प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे की. उन्मेश पाटील यांची उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर करून त्यांना एबी फॉर्म दिला. अशी माहिती भैय्यासाहेब पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. लोकसभेवेळी उन्मेश पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला होता. उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे. एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात दुःख आहे. अशी भावुक प्रतिक्रिया उमेश पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिलेली आहे.

भैय्यासाहेब पाटील काय म्हणाले…?

उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झालेली नसताना उद्धव ठाकरेंनी त्यांना एव्ही फॉर्म दिला आहे. अशी माहिती भैय्यासाहेब पाटील यांनी दिलेली आहे. वास्तविक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची जागा असताना राजीव देशमुख यांनी मोठे मन करून उमेदवारी मिळवून दिली. त्यांची मी आभार व्यक्त करेन. अशी उन्मेश पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे.

संपदा पाटील काय म्हणाल्या…..?

खासदारकीला चाळीसगावकरांचे भूषण असताना त्यांना पक्षाने डावललं. आज उद्धव ठाकरेंनी आणि महाविकास आघाडीने उन्मेश पाटलांना न्याय दिला आहे. ही लढाई वीस वर्षे केलेला हा तप आहे. या कपाची आज पुन्हा एकदा नवी सुरुवात झाली आहे. बहुजन समाजातील उंचशिक्षित तरुण ज्याला डावलले गेले आज नवी सुरुवात होत आहे. अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांन उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांनी दिलेली आहे.

एका बाजूला शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस मधील जागा वाटपाचा वाद सिंगेला असतानाच. दुसऱ्या बाजूला चाळीसगाव मधून उमेश पाटील यांना नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे गटाकडून एबी फॉर्म देण्यात आलेला आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">