जेव्हापासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे. तेव्हापासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरून सातत्याने बैठका सुरू आहेत. पण अजून पर्यंत देखील जागा वाटपाचा मुद्दा सुटलेला नाही आहे. आणि शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस या दोघांमधील वाद वाढल्याचं सांगण्यात येत आहे. संजय राऊत प्रसार माध्यमांची बोलताना म्हटले की राज्यातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाही. काँग्रेसकडून संजय राऊत यांच्यावर पलटवार करण्यात आला उद्धव ठाकरे पेक्षा संजय राऊत मोठे नेते असतील. विदर्भातील जागा वाटपाचा मुद्दा सुटता सुटत नाही आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्या दोघांमध्ये जोराने रस्सीखेच सुरू आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी तातडीने शिवसेना नेत्यांची बैठक मातोश्रीवर बोलावली होती.
शिवसेना नेत्यांची ही बैठक जवळपास 2 तास पार पडली त्यानंतर संजय राऊत हे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीसाठी गेले. भेटीला जाण्याआधी संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की. सध्या निवडणुकीचे दिवस आहेत. महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. त्यात काँग्रेसचे नेते दिल्लीत आहेत त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ज्या काही छोट्या-मोठ्या चर्चा आहेत. त्या आज आम्ही पूर्ण करू यशवंतराव चव्हाण सेंटरला आमची बैठक होईल तिथे आम्ही एकत्रित चर्चा करू राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील जे रखडलेले विषय आहेत ते संपवण्याचा आज प्रयत्न करू मातोश्री वरील बैठकीत आणि जे काही निर्णय घेतलेत ते योग्य वेळी लवकरच जाहीर होतील. असं संजय राऊत यांनी सांगितले.
पत्रकार आणि संजय राऊत यांना एक प्रश्न विचारला काँग्रेसला सोडून शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्र लढणार अशी चर्चा सुरू आहे. या प्रश्नावर संजय राऊत यांनी यावर सुचक वक्तव्य केलं. माध्यमांनी बनवलेली स्टोरी आहे ती तुमच्यापर्यंत ठेवली पाहिजे या स्टोरीला काय काँग्रेस का पहा लोकांना पाहायला मजा येते राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा का होऊ नये महा विकास आघाडीच्या जवळपास 15 बैठका झाल्या आहेत आम्ही ३४० तास चर्चा केली तेच सुटेल असं विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे.
विदर्भातील ज्या 12 जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना मध्ये वाद निर्माण झालेला आहे. त्या 12 जागांवरती आता विद्यमान आमदार हे महविकास आघाडीचे नसून सर्व महायुतीचे आहेत. त्या 12 जागा खालील प्रमाणे आहेत.
आरमोरी – कृष्णा गजबे – भाजपा आमदार
गडचिरोली – देवराल होली -भाजपा आमदार
गोंदिया – विनोद अग्रवाल – अपक्ष आमदार
भंडारा – नरेंद्र भोडेकर – अपक्ष आमदार
चिमूर – कीर्ती कुमार बांगड्या – भाजपा आमदार
बलाडपूर – सुधीर मुनगंटीवार – भाजप आमदार
चंद्रपूर – किशोर जोरगेवार – अपक्ष आमदार
रामटेक – आशिष जयस्वाल – अपक्ष आमदार
कामठी – टेकचंद सावरकर – भाजप आमदार
दक्षिण नागपूर – मोहन माते – भाजपा आमदार
अहेरी – धर्मरावबाबा आश्रम – अजित पवार गट आमदार
भद्रावती वरोरा – प्रतिभा धानोरकर – विद्यमान खासदार म्हणून निवडून आल्या.