Test cricket : दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटमध्ये आशियात विजयी, बांगलादेशचा घरच्या मैदानावर पराभव

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Test cricket : ढाका येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान बांगलादेशला पाहुण्या दक्षिण आफ्रिकेकडून चौथ्याच दिवशी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने आशियातील तब्बल 10 वर्षांची कसोटी विजयाची प्रतिक्षा संपवली आहे. दक्षिण आफ्रिका सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून, 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना त्यांनी 7 विकेट्सनी जिंकला. हा विजय दक्षिण आफ्रिकेसाठी विशेष ठरला, कारण त्यांनी 10 वर्षांनंतर आशियात कसोटी सामना जिंकला आहे. या मालिकेतील विजयामुळे त्यांनी बांगलादेशला बॅकफुटवर ढकलले आहे. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला त्यांच्याच घरात 16 वर्षांनंतर पराभूत केले आहे. याआधी 2008 साली त्यांनी बांगलादेशला त्यांच्या घरात नमवलं होतं. बांगलादेश कर्णधार नजमुल शांतोने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 106 धावांवर संपुष्टात आला. महमुदुल हसन जॉयने सर्वाधिक 30 धावा केल्या, पण इतर फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. कगिसो रबाडा, वियान मुल्डर, आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 308 धावा करत 202 धावांची मोठी आघाडी घेतली. कायले वेरेनीच्या शतकी खेळीमुळे आफ्रिकेची स्थिती सुधारली. त्यावेळी संघ 6 बाद 108 अशा अडचणीत होता, पण कायलेने संयमी फलंदाजी करत शतक झळकावलं आणि संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं.दुसऱ्या डावात बांगलादेशने 207 धावा केल्या, मात्र कगिसो रबाडाने 6 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी फक्त 106 धावांचे लक्ष्य दिले. हे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने सहजच 3 विकेट्स गमावून पूर्ण केले, आणि मालिका 1-0 ने पुढे नेली.दक्षिण आफ्रिकेने या विजयासह आशियात पराभवाची मालिका थांबवली आणि त्यांच्या कामगिरीने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. या टेस्ट क्रिकेट सामन्यामध्ये दोन्ही संघांची प्लॅन इलेव्हन मध्ये खाली दिलेले प्लेयर खेळत होते.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन :

नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, झाकेर अली, नईम हसन, तैजुल इस्लाम आणि हसन महमूद.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन :

एडन मार्करम (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, रायन रिकेल्टन, मॅथ्यू ब्रेट्झके, कायले वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि डेन पिएड.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">