Shivsena vs Shivsena : यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार असली, तरी शिंदे गट आणि ठाकरे गटातील सामना विशेष लक्षवेधी ठरणार आहे. तब्बल २६ मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना जशी थेट स्पर्धा पाहायला मिळेल, ज्यामुळे या निवडणुकीला अधिक रंगत येणार आहे.
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या आहेत, आणि अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यंदा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असली, तरी विशेष लक्ष शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्षांकडे लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत २६ मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थरार रंगणार आहे.
उद्धव ठाकरे गटाने ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत वरळीमधून आदित्य ठाकरे, कोपरी-पाचपाखडीमधून केदार दिघे, ठाणे मतदारसंघात माजी खासदार राजन विचारे आणि वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई यासारख्या महत्वाच्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. या यादीत जुन्या आणि नव्या चेहऱ्याऱ्यांचे समतोल साधला आहे.
दुसरीकडे, शिंदे गटाने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात कोपरी-पाचपाखडीमधून एकनाथ शिंदे, महाडमधून भरत गोगावले आणि कुडाळमधून निलेश राणे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांमध्ये खालील मतदारसंघांमध्ये लढत होणार आहे. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे केदार दिघे विरुद्ध शिंदे गटाचे एकनाथ शिंदे, ओवळा माजीवडा मध्ये ठाकरे गटाचे नरेश मनेरा विरुद्ध शिंदे गटाचे प्रताप सरनाईक, मागाठणे मध्ये ठाकरे गटाचे अनंत नर विरुद्ध मनीषा वायकर, कुर्ला मध्ये ठाकरे गटाच्या प्रविणा मोराजकर विरुद्ध शिंदे गटाचे मंगेश कुंडाळकर, माहीम मध्ये ठाकरे गटाचे महेश सावंत विरुद्ध शिंदे गटाचे सदा सर्वांकर, महाडमध्ये टाकरे गडाची स्नेहल जगताप विरुद्ध शिंदे गटाचे भरत गोगावले, राधानगरी मध्ये ठाकरे गटाचे के पी पाटील विरुद्ध शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर, राजापूर मधून टाकरे गटाचे राजन साळवी विरुद्ध शिंदे गटाचे किरण सामंत, पाटण मधून ठाकरे गटाचे हर्षद कदम विरुद्ध चिन्ह गटाचे शंभूराज देसाई, मालेगाव ब्राह्य मध्ये ठाकरे गटाचे अदय हिरे विरुद्ध शिंदे गटाचे दादा भुसे, आशा आदी उमेदवारांमध्ये ही लढत रंगणार आहे.
महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होईल, तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी प्रचाराची मोहीम जोरात सुरू केली आहे, आणि लवकरच महाराष्ट्रातील राजकीय चित्र स्पष्ट होईल.