शिवसेना ठाकरे गटाचे 53 उमेदवार ठरले, नवीन चेहऱ्यांना संधी, आज होणार उमेदवारांची घोषणा

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Maharashtra vidhansabha election 2024 : शिवसेना ठाकरे गटामध्ये आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून जी काही तानातानी सुरू आहे. तो मुद्दा सुटेल की नाही हे लवकरच समोर येणार आहे. अशातच महायुतीने जागा वाटपामध्ये आघाडी घेतलेली आहे. आणि महायुतीचे सर्व उमेदवार देखील ठरलेले आहेत. मात्र काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या दोघांकडून रस्सीखेच सुरू आहे. आता हा जागावाटपाचा विषय सुटेल की नाही हे काही वेळात समोर येईल. मविकास आघाडी मध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी आता आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आलेली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचा आणि काँग्रेसमध्ये चालू असलेली मुंबईतील काही जागांवरून रस्सीखेच मुळे जागावाटपाच्या मुद्द्यावर कुठेतरी मागे पडलेली दिसून येत आहे. त्यातच महायुती मधून भारतीय जनता पक्षाने आपल्या 99 उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर करून दिली. आणि आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे देखील याद्या जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. पण इकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांचा वाद मिटत नसल्यामुळे याचा झटका महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षांना बसू शकतो. कारण निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. पण आता काही वेळातच आज शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातला तिढा सुटेल असं सांगण्यात येत आहे. आणि महाविकास आघाडीची समन्वय साधण्याची जबाबदारी आता बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आलेली आहे. आणि अशातच शिवसेना ठाकरे गटाची एकूण 53 उमेदवारांची यादी अंतिम केल्याची माहिती समोर आलेली आहे.

आता शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 86 इच्छुक उमेदवारांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्री वर बोलावलेले आहे. आणि त्यातून 53 मतदारसंघांमधून उमेदवारांचे नाव निश्चित करण्यात आलेले आहेत. ज्या मतदारसंघांमधून एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक आहेत त्या मतदारसंघांचा सर्वे रिपोर्ट शिवसेना ठाकरे गट घेणार आहे. आता या सर्व इच्छुक उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून मतदारसंघांचा आढावा घेण्यात आलेला आहे. आणि शिवसेना ठाकरे गटाकडून ज्या मतदारसंघांमध्ये एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचा तिढा नाही त्या मतदारसंघांमधून उमेदवारांना तयारी करायला शिवसेना ठाकरे गटाकडून मातोश्री वरून सांगण्यात आलेलं आहे. असे एकूण कोणत्याही प्रकारचा तिळा नसलेल्या 53 जागां मधून उमेदवारांना तयारीचे आदेश मातोश्री वरून देण्यात आलेले आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यामध्ये वाद निर्माण झाले होते. त्यानंतर संजय राऊत आणि ठाकरे गटाचे नेत्यांनी काँग्रेस हायकमांडकडे यासंदर्भातील तक्रार केलेहोती. आता त्यानंतर काँग्रेस आहे कमानी ठाकरे गटाची प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं करून महाविकास आघाडी समन्वय साधण्याची जबाबदारी आता बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आलेली आहे. आता आज दुपारी एक वाजता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आज जागा वाटपाचा तिढा सुटू शकतो आणि उद्धव ठाकरे उमेदवारांची यादी आज जाहीर करू शकतात.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">