महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे. मात्र महाविकास आघाडीच जागा वाटपाच्या विषयावरून अजून देखील रस्सीखेच सुरू आहे. या जागावाटपाच्या मुद्द्यावरून हा विकास आघाडी कधीही फुटू शकते. अशी परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या 17 जागा निवडून टिळा सुटता सुटत नाही आहे. आणि विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. कशामध्ये ठाकरे गटाच्या गोटतून मोठे वृत्त समोर येत आहे.
महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे विश्वासू नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती. त्या बंडखोरी वेडी जे आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले होते त्यांच्यातूनच दोन आमदारांचे तिकीट उद्धव ठाकरे यावेळेस शक्यता वर्तवली जात आहे. तिकीट कापलं जाण्याचं समजतात दोन्ही आमदार मातोश्रीवर पोचलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सर्वात मोठी ताकद मुंबईमध्ये आणि कोकण पट्टा या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेना शिंदे गटाला मोठे आव्हान असणार आहे. त्यांना विरोधात चांगला दगडा उमेदवार त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. उद्धव ठाकरे मुंबईतील शिवडी आणि चेंबूरमध्ये नव्याचेरांवर डाव लावण्याची यावेळेस शक्यता वर्तवली जात आहे. कारण मुंबईमध्ये कट्टर विरोधक भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेना शिंदे गटाची देखील चांगली ताकद आहे. महायुती मधील फक्त राष्ट्रवादी अजित पवार गटाची त्या ठिकाणी ताकद कमी आहे. आणि बाकी राहिलेल्या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे हे विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देणार आहेत.
शिवसेना ठाकरे गट सोबत राहिलेल्या ज्या विद्यमान आमदारांची तिकीट कापणार आहे. त्यातील एक आमदार शिर्डीचे अजय चौधरी आणि चेंबूरचे आमदार प्रकाश फातफेकर हे दोघं विद्यमान आमदार आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री वरती दाखल झालेले आहेत. शिवडी मतदारसंघातून इच्छुक उमेदवार लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी हे देखील मातोश्री वरती दाखल झालेले आहेत. आणि चेंबूर मतदारसंघातून इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयारी केलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे विद्यमान आमदारांना वगळून नवीन इच्छुक उमेदवारांना तिकीट देणार आहेत. आता मातोश्री वरती दाखल झालेले विद्यमान आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा करतात. याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.