Shivsena candidate list : शिवसेना शिंदे गटाची पहिली उमेदवारी यादी जाहीर, पहा कोणा कोणाला संधी देण्यात आली

By janshahi24news

Updated on:

Follow Us
---Advertisement---

Shivsena candidate list : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. शिंदे गटाने सध्याच्या आमदारांवर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे, यामुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, ज्यात 45 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीने या यादीच्या घोषणेसह निवडणुकीत आघाडी घेतल्याचे दिसत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या काही जागांवर शेवटपर्यंत उमेदवार निश्चित न झाल्यामुळे त्यांना मोठा फटका बसला होता. मात्र, यावेळी ही चूक सुधारत, महायुतीने जागावाटपाचा निर्णय लवकरच घेत उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये अद्यापही काही मुद्द्यांवर चर्चा सुरू असली, तरी सर्व पक्ष उमेदवारांची घोषणा करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने पहिली यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे, आणि उर्वरित यादीही लवकरच प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा आहे. शिवसेना शिंदे गटाकडून अनेक मंत्र्यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

शिवसेना शिंदे गडाकडून जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून गुलाबराव पाटील राज्याचे पाणीपुरवठा मंत्री यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून मंत्री अब्दुल सत्तार यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. मालेगाव ब्राह्य विधानसभा मतदार संघातून दादाजी भुसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पराडा विधानसभा मतदारसंघातून तानाजी सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातून शंभूराज देसाई यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. या काही मंत्र्यांची आणि आमदारांची पुन्हा विधानसभेच्या रिंगणात लढत होणार आहे. शिंदे गडाकडून भरपूर विद्यमान आमदारांना संधी दिलेली दिसून येत आहे

अमित ठाकरे

माहिममध्ये आता सदा सरवणकर आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यात थेट लढत होणार आहे, त्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत उत्सुकता वाढली आहे, आणि दोन्ही पक्षांतल्या दिग्गज उमेदवारांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">