Share market news : घसरण थांबता थांबेना! विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीने भारतीय बाजारात 10 लाख कोटींचा फटका

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Share market news : भारतीय शेअर बाजारात घसरणीचं सत्र अजूनही कायम आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा आणि जागतिक घडामोडींचा परिणाम म्हणून बाजारात सतत पडझड सुरूच आहे. आज आठवड्याच्या अखेरच्या ट्रेडिंग सत्रातही तेजीने सुरुवात झाल्यानंतर अचानक बाजारात मोठी घसरण झाली. नफावसुलीमुळे सेन्सेक्स ६०० अंकांनी तर निफ्टी २०० हून अधिक अंकांनी खाली आला. या घसरणीमुळे बीएसई आणि एनएसईवरील बहुतांश कंपन्यांचे शेअर्स नुकसानात आहेत.

बाजाराच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका

आजच्या घसरणीत गुंतवणूकदारांचं सुमारे सहा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. बीएसईवरील मिडकॅप निर्देशांक १३०० अंकांनी तर स्मॉलकॅप ४०० अंकांनी खाली आला आहे. याशिवाय, मार्केट कॅप ४४४ लाख कोटी रुपयांवरून ४३४ लाख कोटी रुपयांवर घसरल्याने गुंतवणूकदारांचं एकूण नुकसान तब्बल दहा लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.बँकिंग समभागांत विक्रीचा जोर, IT आणि FMCG क्षेत्रात खरेदी

बँकिंग सहभागात विक्रीचा जोर, IT आणि FMCG क्षेत्रात खरेदी

आजच्या ट्रेडिंगमध्ये बैंकिंग समभागांत मोठी विक्री झाली आहे, ज्यामुळे बँक निफ्टी १,००० अंकांनी घसरला. याशिवाय, ऑटो, फार्मा, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी आणि ऑइल अॅड गॅस क्षेत्रातही पडझड दिसून येत आहे. मात्र, IT आणि FMCG क्षेत्रात खरेदीच्या काही सकारात्मक चिन्हे दिसली.

विदेशी गुंतवणूकदारांचा माघार

चालू महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढले आहेत. ऑक्टोबर महिन्यात एकूण विक्री ९७,११३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, या विक्रीनंतर ही रक्कम एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली, परंतु काही वेळातच मोठी घसरण सुरू झाली. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. सुरुवातीच्या सकारात्मकतेनंतर, बाजाराच्या स्थिरतेमध्ये कमी होण्याची चिंता वाढली आणि नफावसुलीच्या दबावामुळे बाजारातील हालचाल मंदावली. आठवडयाच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली. यावेळी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कमी झाले. विशेषतः बैंकिंग आणि ऑटो क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा दबाव वाढला. या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदारांचे लाखो रुपये गमावले गेले. दिवसाच्या सुरुवातीला बाजारात तेजीची लहर होती, परंतु काही काळानंतर नफावसुलीने बाजाराला खाली खेचले. अनेक गुंतवणूकदारांनी फायदा घेण्यासाठी त्यांच्या शेअर्सची विक्री केली, ज्यामुळे बाजाराची स्थिती बिघडली. यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे, आणि बाजारातील अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी त्यांना अधिक सावध राहण्यास भाग पाडले,

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">