Sharad Pawar news : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबई काही दिवसांपूर्वीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. बाबा सिद्दिकी यांच्या हत्तीची जबाबदारी बिश्नोई गॅंगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घेतली होती. त्यानंतर आता केंद्रीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि भारताचे माजी कृषिमंत्री व महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते असलेले शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राकडून आग्रह करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ असताना बाबा सिद्दिकी यांच्या हत्तीची घटना घडली त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. बाबा सिद्दिकी यांना काही दिवसाआधी धमकी आलेली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी मागणी केली होती पण त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली नाही. सरकारने त्यांना सुरक्षा न पुरवल्यामुळे विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांना चांगलंच डीवचण्यात आलं होत. केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने याआधीही शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा दिली होती मात्र शरद पवार यांनी ती सुरक्षा नाकारली होती. आता पुन्हा केंद्रीय सुरक्षा यंत्रणेंनी शरद पवार यांना झेड प्लस सिक्युरिटी देण्याबाबतचा निर्णय घेतलेला आहे. आता केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सुरक्षा देण्यासाठी शरद पवार यांच्याशी संपर्क साधणार आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी केंद्रीय सुरक्षा नाकारली होती. तेव्हा शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी तब्बल 55 सीआरपीएफ जवानांची तुकडी सज्ज करण्यात आली होती मात्र शरद पवार यांनी ती सुरक्षा नाकारली होती शरद पवार यांना सुरक्षा घेण्यासाठी दिल्लीतील पोलीस अधिकारी आणि पंधरा सी आर पी एफ अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी सुरक्षा घेण्यासंदर्भातील चर्चा केली होती मात्र शरद पवार यांनी तेव्हा सुरक्षाही नाकारली आणि सुरक्षा दलाचे वाहन घेण्यासाठी ही शरद पवार यांनी नकार दिला होता. मात्र आता पुन्हा शरद पवार यांना सुरक्षा देण्या संदर्भात केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने निर्णय घेतलेला आहे आता शरद पवार हे केंद्रीय झेड प्लस सुरक्षा आग्रह करून दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.