Royal Enfield Goan Classic 350 : तरुणाईचा आवडता ब्रँड Royal Enfield; नवी Goan Classic 350 झाली लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये

By janshahi24news

Published on:

Follow Us
Royal Enfield Goan Classic 350
---Advertisement---

Royal Enfield Goan Classic 350 Launch India : भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफिल्डच्या मोटरसायकल्सने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तरुण पिढीला रॉयल एनफिल्डच्या बाईक्सचे प्रचंड आकर्षण आहे. कंपनीने आता आपली नवीन मोटरसायकल Goan Classic 350 भारतीय बाजारात सादर केली आहे. या नव्या मॉडेलने बाजारात धमाका केला असून त्याची एक्स-शोरूम किंमत 2.35 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही बाईक चार वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.

Royal Enfield Goan Classic 350

Goan Classic 350 बॉबर स्टाईलमध्ये डिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये हँगर स्टाइल हँडलबार, नवीन कलर ऑप्शन्स, आणि एलईडी लायटिंगचा समावेश आहे. या मोटरसायकलच्या डिझाइनमध्ये खास टच देण्यात आले आहे, ज्यामुळे ती तरुणाईमध्ये लोकप्रिय होणार, हे निश्चित आहे. याशिवाय, ही रॉयल एनफिल्डची पहिली बाईक आहे जी ट्यूबलेस स्पोक्ड व्हील्ससह सादर करण्यात आली आहे. या फीचरमुळे बाईक अधिक सुरक्षित आणि मजबूत बनते.

Royal Enfield Goan Classic 350 मध्ये 348 सीसीचे सिंगल सिलेंडर, एयर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे पॉवरफुल इंजिन 20.7 bhp पॉवर आणि 27 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये 5-स्पीड गियरबॉक्सचा समावेश आहे. बाईकच्या सस्पेंशनवर देखील उत्तम काम झाले आहे. समोरच्या बाजूस टेलिस्कोपिक फॉर्क्स तर मागील बाजूस ट्विन शॉक सस्पेंशन दिले आहे. या सिस्टीममुळे रस्त्यावर बाईक चालवताना गती आणि स्थिरता टिकून राहते.

Goan Classic 350 ही क्लासिक 350 पेक्षा वजनाने जास्त आहे. Goan Classic 350 चे वजन 195 किलो आहे, जे क्लासिक 350 पेक्षा 2 किलो अधिक आहे. मात्र, वजनातील हा फरक राइडिंगला अजिबात अडचण ठरणार नाही, असे कंपनीने सांगितले आहे.

Goan Classic 350 मध्ये काही आधुनिक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. या बाईकमध्ये सेमी-डिजिटल ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ट्रिपर पॉड नेव्हिगेशन, आणि USB पोर्ट दिले आहेत. ट्रिपर पॉडच्या मदतीने बाईक रायडर्सना नेव्हिगेशन सोपी होणार आहे. बाईकच्या डिझाईनमध्ये मोठे बदल केले गेले आहेत, मात्र, इंजिन तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्समध्ये क्लासिक 350सारखाच अनुभव मिळतो.

Goan Classic 350 ही बाईक विशेषतः त्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे जे क्लासिक डिझाईनसोबत हाय-परफॉर्मन्स मोटरसायकल खरेदी करण्याचा विचार करत आहेत.

Royal Enfield Goan Classic 350 ची एक्स-शोरूम किंमत 2.35 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या बाईकचे चार वेगवेगळे व्हेरिएंट्स बाजारात सादर करण्यात आले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">