Ratan Tata net worth : रतन टाटा यांची 7,900 कोटींची संपत्तीः चार विश्वासू लोक आता करतील टाटांची अंतिम इच्छा पूर्ण?

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Ratan Tata net worth : रतन टाटांची वैयक्तिक संपत्ती ७,९०० कोटी रुपर्यावर पोहोचली आहे. मेहिल मिस्त्री आणि रतन टाटा हे आरएनटी असोसिएट्सचे सदस्य होते. मेहिल मिस्त्री है टाटा सन्सचे माजी अध्यक्ष दिवंगत सायरस मिस्त्री यांचे चुलत भाऊ आहेत. सायरस मिस्त्री यांच्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासंबंधीच्या वादात मेहिलने रतन टाटांना सतत समर्थन दिले. या नात्यामुळे टाटा कुटुंबाच्या व्यवसायातील गुंतागुंतीचे संबंध आणि त्यांच्या एका गटात असलेल्या एकतेचा देखील प्रत्यय येतो.

भारतीय उद्योग क्षेत्रातील एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांचे काही दिवसांपूर्वी मुंबईत निधन झाले. त्यांच्या मागे 7,900 कोटी रुपयांची संपत्ती आहे. रतन टाटा यांनी आपल्या जीवनात एक मृत्यूपत्र तयार केले होते, ज्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्या वकील मित्र डेरियस खंबाटा आणि सहकारी मेहली मिस्त्री यांच्यावर सोपवली आहे. यामध्ये त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि डायना जीजीभॉय यांना देखील समाविष्ट करण्यात आले आहे.

गुंतवणूक आणि सामाजिक योगदान

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार, रतन टाटा यांच्याकडे टाटा सन्समध्ये 0.83% भागीदारी आहे. त्यांची इच्छा होती की, त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग परोपकार आणि समाजाच्या कल्याणासाठी द्यावा, त्यांच्या संपत्तीतून जवळपास तीन चतुर्थांश भाग टाटा सन्समध्ये आहे. त्यांनी ओला, पेटीएम, ट्रॅक्सन, फर्स्टक्राय, ब्लूस्टोन, कारदेखो, कॅशकारो, अर्बन कंपनी आणि अपस्टॉक्ससारख्या अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती, परंतु काही कंपन्यांमध्ये त्यांनी आपली भागेदारी नंतर विकली.

रतन टाटा यांचे मुंबईतील कुलाबामध्ये एक घर आहे तसेच अलीबागमधील समुद्र किनारी एक होलिडे होम आहे. त्यांच्या मृत्यूपत्राची माहिती खासगी ठेवण्यात आलेली आहे. मेहली मिस्त्री हे रतन टाटा यांचे विश्वासू सहकारी होते आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टच्या बोर्डावर विश्वस्त होते. टाटा समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांमधील टाटा सन्सच्या समभागाचे बाजार मूल्य सुमारे 16.71 लाख कोटी रुपये आहे.

डेरियस खंबाटा आणि मेहली मिस्त्री

डेरियस खंबाटा हे रतन टाटा यांचे वकील आहेत, ज्यांनी त्यांच्या मृत्यूपत्र तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी सात वर्षांच्या कालावधीनंतर मागील वर्षी टाटाच्या दोन प्राथमिक ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून पुनरागमन केले. मेहली मिस्त्री, जो टाटा सन्सचे माजी अध्यक्ष दिवंगत सायरस मिस्त्री यांचे चुलत भाऊ आहेत, यांनी रतन टाटा यांना त्यांच्या कारकिर्दीत सातत्याने पाठिंबा दिला. रतन टाटा यांच्या आरोग्याचीदेखभाल करण्यासाठीही मेहली मिस्त्री सक्रिय होते.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">