राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची नेते माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास लॉरेन्स बिश्नोई गॅंग कडून गोळ्या झाळून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांच्यावर वांद्रे येथे निर्मल नगर परिसरात तीन तरुणांकडून गोळीबार करण्यात आला होता आणि बाबा सिद्दिकी यांना त्या गोळीबारात तीन गोळ्या लागल्या होत्या त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला ही एक गोळी पायाला लागली होती. बाबा सिद्दिकी यांच्या हत्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. ज्या तिघांनी बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार केला त्या तिघांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यातील एक व्यक्ती हा त्या दोघांना मदत करणारा असल्याची माहिती आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्यानंतर विरोधकांकडून सत्ताधारकांन वरती मोठ्या प्रमाणात टीका केल्या जात आहेत. लॉरेन्स बिस्नोई गॅंगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्तीची जबाबदारी स्वीकारलेली आहे. सोशल मीडियावर बाबा सिद्दिकी यांच्या हत्या बद्दल पोस्ट करत जबाबदारी स्वीकारलेली आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धोका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दिकी यांना देखील काही दिवसापूर्वी धमकी आलेली होती आणि त्यांनी सुरक्षेत वाढ करण्यासाठी मागणी केली होती पण सरकारकडून त्यांना सुरक्षा नाही दिली होती आणि त्यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार करण्यात आला त्या गोळीबारात बाबा सिद्धीची यांचा मृत्यू झाला. तसेच जितेंद्र आव्हाड यांना ही काही दिवसापूर्वी लॉरेन्स बिश्नोई गॅंग कडून धमकी मिळालेली आहे. आणि धमकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी सुरक्षेबद्दल सरकारकडे मागणी केली होती पण त्यांच्या सुरक्षित कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही आहे. आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांन कडून पोलिसांकडे जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. जर जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा नाही वाढवण्यात आली तर आम्ही आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीचे पदाधिकारी हेमंत वाणी यांनी प्रशासनाला दिलेला आहे. आता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष पोलीस जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा वाढवतात का याकडे लागलेली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गॅंगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्तीची जबाबदारी स्वीकारली
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्तीची जबाबदारी सोशल मीडियावर पोस्ट करत बिस्नोई गॅंगने काल रविवारी स्वीकारलेली आहे. ही पोस्ट लॉरेन्स बिस्नोई यांच्या गॅंगचा एका सदस्याने फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिलेली आहे. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे बिस्नोई गॅंगचा हात आहे असे या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. सिद्दिकी यांच्या हत्तीची जबाबदारी अनमोल विष्णू यांनी घेतली आहे. दाऊदचे जवळचे असल्यामुळे सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली असे या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे.