बीड जिल्ह्यात भाजपला धक्का, पंकजा मुंडे यांच्या सहकार्याचा राजीनामा, गंभीर आरोप उघड

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

बीड जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे. राजेंद्र मस्के यांनी गंभीर आरोप करत भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देण्यात आलेली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभेची नुकतीच निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाची पहिली उमेदवारी यादी काल 20 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने या यादीमध्ये एकूण 99 उमेदवारांचा समावेश केलेला आहे. भाजपने जाहीर केलेल्या 99 उमेदवारांची यादी नंतर बरेचसे उमेदवार आनंदित दिसून येत आहेत तर काही उमेदवार नाराजी दिसून येत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पक्षाची जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आपल्या जिल्हा अध्यक्ष पदाचा नुकताच राजीनामा देत पक्षाला सोडचिट्टी दिलेली आहे.

पंकजा मुंडेंच्या सहकाऱ्याचा कोणतेही काम न करण्याचा निर्णय

बीड जिल्ह्याची ओळख ही भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ला म्हणून होती पण आता बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठे धक्के बसताना दिसून येत आहेत. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सर्व बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि त्या बैठकीत भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हणाले . की मी मागील सहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतोय. बीड विधानसभा मतदारसंघाचे तिकीट मिळेल या अनुषंगाने माझे काम सुरू आहेत. असं राजेंद्र मस्के म्हणाले.

पुढील दोन दिवसांनी फॉर्म भरण्यास सुरुवात होईल. आचारसंहिता लागली आहे. त्यातच मला भारतीय जनता पक्ष कडून अजून कोणतीही विचारणा करण्यात येत नाही आहे. पक्षाकडून कोणतेही बैठक देखील घेतला जात नाही आहे. आता चाललं काय आहे हे मला मी जिल्हाध्यक्ष असून देखील विचारण्याची पाळी आलेली आहे. मी आज ही बैठक भारतीय जनता पक्षाच्या अनुषंगाने घेतली. आता याच्यापुढे मी कोणतेही काम भाजपचे करणार नाही असं जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले.

शरद पवार गटात प्रवेश

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आता भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते लवकरच शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. कारण राजेंद्र मस्के ही शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे समजत आहे. लवकरच शरद पवार गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांच्याकडे बीड जिल्ह्या ची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">