Priyanka Gandhi vs navya haridas : केरळच्या मधील वयनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी यांच्या .विरोधात भाजपने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे. भारतीय जनता पक्षाने नुकतीच 25 विधानसभा आणि एका लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज जाहीर केलेली आहे. भारतीय जनता पक्षाने केरळ मधील वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नव्या हरिदास यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे.
भाजपने केरळ मध्ये 24 विधानसभा आणि एक लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा केलेली आहे. सर्वात जास्त चर्चेत असलेली वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेवर काँग्रेसच्या प्रियंका गांधी विरोधात भारतीय जनता पक्षाच्या इंजिनियर नव्या हरिदास यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. नव्या हरिदास या केरळमधील वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहेत. काँग्रेसचे विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दोन मतदारसंघांमध्ये विजय प्राप्त झाल्यामुळे त्यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला होता. यासाठी या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवून प्रियंका गांधी राजकारणात प्रथमच एन्ट्री करत आहे.
पोटनिवडणूक का होत आहे….
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन मतदारसंघातून उमेदवारी केली होती. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदार संघातून आणि केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. आणि राहुल गांधी यांनी दोन्ही लोकसभेच्या जागांवर विजय मिळाला. त्यानंतर राहुल गांधी यांनी केरळ मधील वयनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला होता. आता त्यांच्या जागी काँग्रेसचे प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवण्यात आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या महिला उमेदवार विरुद्ध महिला उमेदवारच मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही निवडणूक जोरदार अशी रंगणार आहे. भारतीय जनता पक्षाने मैदानात उतरवलेल्या नव्या हरिदास कोण आहेत….?
नाव्या हरिदास कोण?
39 वर्षीय नाव्या हरिदास भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या राज्य महासचिव आहेत. राजकारणात सक्रिय असलेल्या नाव्या हरिदास यांनी आपले शिक्षण के एम सी टी इंजीनियरिंग कॉलेज येथून 2007 मध्ये बी. टेक मधून पूर्ण केलेलं आहे. नाव्या हरिदास या एक मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. नाव्या हरिदास यांचे पती शोभिन श्याम हे आहेत. नाव्या हरिदास यांनी यादीही विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत कोझिकोड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्या मैदानात उतरले होत्या तिथे त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या.