Vanchit Bahujan Aaghadi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. आता वंचित बहुजन आघाडीने तिसरी 30 उमेदवारांची याद आहे. या उमेदवारी यादीमध्ये अनेक जाती-प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत वंचित बहुजन आघाडी कडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 51 उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आलेली आहेत. या प्रकाशित केलेले यादीमध्ये वंचित ने उमेदवारांच्या नावासोबत जातीचा देखील समावेश केलेला आहे. धुळे शहर, शिंदखेडा, उमरेड, बल्लारपूर, चिमूर अशा आधी मतदारसंघांसाठी उमेदवारांची वंचित ने घोषणा केलेली आहे.
वंचित बहुजन आघाडीने आचारसंहिता लागल्यानंतर 30 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीने आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या दोन उमेदवारी याद्या जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये पहिल्या उमेदवारी यादी 11 उमेदवारांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. आणि दुसरे उमेदवार यादीत दहा उमेदवारांच्या नावाचा समावेश केला होता. आणि आता आचारसंहिता लागल्यानंतर तिसरी 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा वंचित बहुजन आघाडीने केली आहे. अशा एकूण 51 उमेदवारांची नावे वचित बहुजन आघाडी कडून घोषित करण्यात आलेली आहेत. धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी बौद्ध समाजाचे जितेंद्र शिरसाठ यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघासाठी राजपूत समाजाचे भोजासिंग तोंडरसिंग रावल यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे, उमरेड मतदार संघासाठी बौद्ध समाजाच्या सपना राजेंद्र मेश्राम यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे, बल्लारपूर मतदारसंघासाठी कुणबी समाजाचे सतीश मुरलीधर मालेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, चिमूर विधानसभा मतदारसंघासाठी माना समाजाचे अरविंद आत्माराम सादेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, किनवट विधानसभा मतदारसंघासाठी अंध आदिवासी समाजाचे प्रा. विजय खूपसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, नांदेड उत्तर मतदारसंघासाठी बौद्ध समाजाचे प्राध्यापक डॉक्टर गौतम दुथळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, देगलूर मतदारसंघासाठी बौद्ध समाजाचे सुनील कुमार देगलूरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, पाथरी मतदारसंघासाठी माळी समाजाचे विठ्ठल तडेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, परतुर आष्टी मतदारसंघासाठी माळी समाजाचे रामप्रसाद थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, घनसावंगी मतदारसंघासाठी धनगर समाजाच्या सो. कावेरीताई बळीराम खटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, जालना मतदारसंघातून ख्रिश्चन धर्माचे डेव्हिड घुमारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, बदलापूर मतदारसंघातून बौद्ध समाजाचे सतीश खरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, देवळाली मतदारसंघातून बौद्ध समाजाचे अविनाश शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, इगतपुरी मतदारसंघातून कोडी महादेव समाजाची भाऊराव काशिनाथ दगडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून उत्तर भारतीय समाजाचे डॉक्टर संजय गुप्ता यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, अनुशक्ती नगर मतदारसंघातून बौद्ध समाजाचे सतीश राजगुरू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, वरळी मतदारसंघातून बौद्ध समाजाचे अमोल आनंद निकाळजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, पेण मतदारसंघातून बौद्ध समाजाचे देवेंद्र कोळी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, आंबेगाव मतदार संघातून कोळी समाजाचे दीपक पंचमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. अजून आधी दहा उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. हे उमेदवार वचित कडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेले आहेत.