विधानसभेपूर्वी मोठी बातमी निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला जाहीर.

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते खासदार नितेश राणे यांची सुपुत्र निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटात लवकरच पक्षप्रवेश करून हाती धनुष्यबाण घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जेव्हापासून जाहीर केलेले आहेत तेव्हापासून राजकीय घडामोडींना मोठा वेग आलेला आहे. निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटात उद्या दिनांक 23 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राण्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. याबद्दलची माहिती निलेश राणे यांनी स्वतः आज पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे. नारायण राणे यांच्या राजकीय कारकीर्दीला ज्या चिन्हावरून सुरुवात झाली. त्याच चिन्हावरून मी पण निवडणूक लढवणार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये निलेश राणे यांनी सांगितलं.

अखेर निलेश राणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश निश्चित झाला कारण गेल्या अनेक दिवसापासून निलेश राणे हे शिवसेनेत पक्षप्रवेश करतील अशा चर्चा सगळीकडे रंगल्या होत्या. आज स्वतः निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व स्पष्ट केलं आणि आगामी विधानसभा यांच्या निमित्ताने त्यांनी चांगले स्पष्टीकरण दिले. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मी 2019 ला नारायण राणे साहेब सोबत भाजपमध्ये आलो. इथे खूप सन्मान मिळाला. अनेक नेत्यांनी आदर दिला. प्रेम दिलं इथे शिस्त पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस आणि लहान भावाप्रमाणे सांभाळलं. रवींद्र चव्हाण यांनीही लहान भावाप्रमाणे वागणूक दिली. सगळ्यात नेत्यांनी चांगली वागणूक दिली असं निलेश राणे बोलले.

निलेश राणे म्हणाले की बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत होते आणि राहतील आताची निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जात आहोत त्यामुळे नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली त्याच चिन्हावर आता मी निवडणूक लढवणार आहे पक्षाच्या हितासाठी मला जे करता येईल ते मी करेन तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे माझे कायम दैवत आहेत ते कायम दैवत राहतील असे निलेश राणेंनी म्हटले.

शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे मैदानात उतरणार आहेत. निलेश राणे यांनी महायुतीमधीलच भारतीय जनता पार्टी या पक्षातून शिवसेना शिंदे गटात उद्या संध्याकाळी चार वाजता पक्षप्रवेश करणार आहेत.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">