NCP candidate list : राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवारी यादी जाहीर,

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

NCP candidate list : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत त्यांनी किती “लाडक्या बहिणींना” उमेदवारी दिली आहे, हे जाणून घेऊया.अजित पवार सतत आपल्या प्रचारात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेबद्दल बोलतात आणि या योजनेच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणावर जोर देत आहेत. या योजनेचा प्रचार करताना, त्यांनी चार महत्त्वाच्या महिलांना उमेदवारी देऊन त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 38 उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या आहेत, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरे व शरद पवार गटाकडून अद्याप यादी जाहीर झालेली नाही.

आधीच भाजपने 99, शिंदे गटाने 45 आणि अजित पवार यांच्या गटाने 38 उमेदवारांची घोषणा केली आहे. महायुतीने आता पर्यंत 288 पैकी 182 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. याआधी, अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावर काही उमेदवारांना एबी फॉर्म देऊन चर्चा केली होती, आणि आता तिन्ही पक्षांनी एकमताने उमेदवारांची यादी तयार केली आहे, त्यामुळे आणखी 106 जागांवर उमेदवारांची घोषणा बाकी आहे.

अजित पवार यांच्या पक्षातून निवडणूक प्रक्रिया सुरू होताच काही जणांनी पक्षांतर केले आहे, आणि शरद पवार गटाकडे राष्ट्रवादीमधील बऱ्याच जणांचा ओढा वाढला आहे. अशा परिस्थितीत, अजित पवारांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्यात लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी सकारात्मक मुद्दे उचलून या योजनेच्या प्रचाराला अधिक महत्त्व दिले आहे.

पहिल्या यादीत, अजित पवारांनी चार महिलांना तिकीट दिले आहे. या महिलांमध्ये श्रीवर्धा मतदारसंघातील आदिती तटकरे, नाशिक देवळालीतील सरोज आहिरे, अमरावती शहरातील सुलभा खोडके आणि पाथरीतील निर्मला उत्तमराव विटेकर यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे महिला राजकारणात आणखी एक पाऊल पुढे टाकत आहेत.

अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मंत्री आहेत त्यांनी 2024 च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी योजना आणली माझी लाडकी बहीण अशे या योजनेचे नाव आहे. आता अजित पवारांना विधानसभा निवडणुकीत या योजनेचा फायदा होतो का. आता याकडे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">