महाविकास आघाडीत जागावाटपावर अद्याप चर्चा सुरू असून, काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्यास विलंब झाला आहे. या यादीची उत्सुकता वाढली असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यादी कधी जाहीर होईल यावर खुलासा केला आहे.नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीत काही जागांबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. महायुतीतील नेत्यांकडून आमच्या जागावाटपावर टीका होत असली तरी, त्यांच्या गोटातही सर्व काही आलबेल नाही. त्यांच्या निर्णयांचे सूत्र दिल्लीमध्ये ठरवले जात आहे, असा टोला त्यांनी महायुतीला लगावला.
उमेदवार यादी कधी येणार?
नाना पटोले यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसची उमेदवार यादी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येईल. उद्या सायंकाळपर्यंत (शुक्रवार) ही यादी अंतिम केली जाईल आणि जाहीर होईल. यादीत असलेल्या उमेदवारांना आवश्यक फॉर्म भरण्याच्या सूचना आधीच दिल्या गेल्या आहेत, असेहीत्यांनी सांगितले.
नाना पटोले यांनी सध्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला फाटा दिला. त्यांच्या मते, निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदावर चर्चा करणे योग्य नाही. आत्ता महाराष्ट्र वाचवणे हे प्रथम दायित्व आहे, असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, आघाडीतील सर्व नेते याच उद्दिष्टावर काम करत आहेत. लोकांनी निवडून दिल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल, त्यामुळे सध्या या चर्चेला पूर्णविराम देण्याची गरज आहे.
पटोले यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली, ते म्हणाले, “सध्या सत्ता उपभोगणारे लोक डाकूसारखे वागत आहेत. मतदान प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसताना, सत्तेत कोण येईल याचे भाकीत त्यांनी जाहीर केले आहे, यातून त्यांच्या डाकूवृत्तीचे दर्शन होते.”
शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पक्ष 100 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. यावर पटोले यांनी टोला लगावत सांगितले की, राऊत यांना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
महायुती मधील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी या सर्व पक्षांच्या उमेदवारी याद्या घोषित करण्यात आल्या आणि उमेदवारांना एबी फॉर्म पण दिले गेले आणि बाकी उमेदवारांचे फॉर्म भरले गेले आहेत. मात्र अद्याप महाविकास आघाडी मधील शिवसेना ठाकरे गटामध्ये आणि काँग्रेस पक्षामध्ये जागावाटपावरून तीढा निर्माण झालेला होता. तो तिढा सुटलेला दिसून येत आहे. मात्र अजून पर्यंत महाविकास आघ शिवसेना ठाकरे गटांनी आपली उमेदवारी अर्ज जाहीर केलेली आहे. काँग्रेसची अध्याप यादी जाहीर करणे बाकी होती. आता प्रतीक्षा संपणार आहे.