‘मिर्झापूर द फिल्म’चा थरारक टीझर रिलीज काय आहे नव्या सिनेमात खास ?

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Mirzapur the film : ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. कालीन भैय्या, गुड्डू पंडित, आणि मुन्ना भैय्या यांच्या ताकदवान भूमिकांमुळे ही सिरीज चाहत्यांमध्ये प्रचंड गाजली. सत्ता, गुंडाराज, आणि गद्दी याभोवती फिरणारी मिर्झापूरची कथा आता आणखी एका मोठ्या अनुभवासाठी सज्ज आहे – लवकरच ‘मिर्झापूर’ सिनेमाच्या रुपात थेट मोठ्या पडद्यावर येणार आहे. या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे.

सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या टीझरमध्ये पुन्हा एकदा कालीन भैय्या, गुड्डू पंडित आणि मुन्ना भैय्याच्या भूमिकांमधील तोच दमदारपणा पाहायला मिळतो. टीझरच्या सुरुवातीला कालीन भैय्या त्यांच्या आवाजात म्हणतात, “गद्दी का महत्त्व तो आप जानते ही हैं – सन्मान, पॉवर, कंट्रोल….” हा डायलॉग ऐकताच प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो. पुढे गुड्डू पंडित म्हणजेच अली फजलचा संवाद, “रिस्क लेना हमारी यूएसपी है,” प्रेक्षकांना गुंगवून ठेवतो. मुन्ना भैय्याच्या दमदार संवादातून ही कथा नव्या मोडात आणि नव्या विचारसरणीवर आधारित असल्याचे संकेत मिळतात. टीझरमध्ये दिसणारे संवाद आणि दृश्यांमुळे सिनेमासाठी प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आणखीवाढली आहे.

सिरीजच्या तिसऱ्या सीझनमध्ये मुन्ना भैय्याचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र, सिनेमाच्या टीझरमध्ये त्याची दमदार एन्ट्री पाहून चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. दिव्येंदू शर्मा आपल्या भूमिकेत पुन्हा एकदा जबरदस्त वाटतोय. तो म्हणतो, “हिंदी फिल्म के हीरो हैं बे! बोले थे ना हम अमर हौ…” याचा अर्थ असा की त्याचं पुनरागमन काहीतरी भन्नाट आणि धक्कादायक घेऊन येणार आहे. यामुळे, सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये एक नवा रोमांच निर्माण झाला आहे.

टीझर रिलीज झाल्यानंतर सिनेमाच्या रिलीज डेटबाबत चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर इन्स्टाग्रामसह विविध प्लॅटफॉर्मवर हा टीझर पोस्ट करण्यात आला असून, कॅप्शनमध्ये, “अब भौकाल भी बडा होगा और पर्दा भी…’ मिर्झापूर द फिल्म’ लवकरच प्रदर्शित होत आहे,” असं सांगितलं आहे. त्यामुळे, ‘मिर्झापूर’ सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘मिर्झापूर द फिल्म’ हा सिनेमा 2026 मध्ये थेट चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. त्यामुळे, सिरीजप्रेमींना आता मोठ्या पडद्यावर हे पात्र अनुभवण्याचा अनोखा आनंद मिळणार आहे. टीझरनेच एक वेगळी ऊर्जा निर्माण केली असल्याने, ट्रेलर आणि पुढील प्रमोशन्ससाठी चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">