महाविकास आघाडी पुन्हा फुटणार, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

MVA breaking news : महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 पासून 2024 पर्यंत अनेक राजकीय भूकंप व त्यांना दिसले आहेत. अनेक वर्षापासून एका पक्षात राहणारे लोकांनी देखील मागील पाच वर्षात बंड केले. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्र शत्रु व त्यांना दिसून आले आणि शत्रू मित्र होताना दिसून आले. या राजकारणापायी अनेकांचे घर देखील फुटताना दिसून आले. आता आगामी विधानसभा तोंडावर येऊन टिपले असता अशातच एक मोठा राजकीय भूकंप होण्याचा दावा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र मध्ये गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राचं वर्तुळ फिरवणारी दोन प्रमुख मातंबर पक्ष फुटताना दिसून आले. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रमुख पक्ष कुठे नंतर आता शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशा नावांनी ओळखले जाऊ लागले आहेत. महाविकास आघाडी मध्ये चालू असलेला विदर्भातील जागावाटपाचा वाद अजून देखील सुटलेला नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला महायुती ने आपल्या जागा वाटपामध्ये आघाडी घेतलेली आहे. आणि महायुती मधून भाजपने आपली एकूण 99 उमेदवारांची उमेदवारी यादी देखील जाहीर करून दिलेली आहे. मात्र महाविकास आघाडीचा वाद आणून देखील चालूच आहे. काही वेळा मध्येच महायुती मधील प्रमुख नेत्यांची जागा वाटप संदर्भात चर्चा होणार आहे अशातच एका जुन्या नेत्यांनी खळबळजणक दावा केलेला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट व काँग्रेस यांच्यामध्ये प्रचंड मतभेद चालू असल्यामुळे महाविकास आघाडी फुटेल असा दावा कोकणातील या एका नेत्यांनी केलेला आहे.

रामदास कदम यांनी महाविकास आघाडी पुण्याचा दावा केला.

महाविकास आघाडी मधील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, यांचा जागा वाटपाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटेल असा मोठा दावा रामदास कदम यांच्याकडून करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे मुख्यमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्याचा आरोप कदमांनी केला. आणि एक मोठा दावा रामदास कदम यांनी केलेला आहे की शरद पवार हे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोघांना संपवतील असा दावा त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. काही तासांमध्येच महाविकास आघाडी तुटल्याचं महाराष्ट्र बघेल असाही दावा कदम यांनी केला आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">