एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा यादी पूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जाहीर केलेली आहे.

Maharashtra Vidhansabha election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा आता घोषित करण्यात आलेले आहेत आणि निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. अशातच आता राज्यभर राजकीय घडामोडींचा धुराळा सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान येत्या 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे आणि निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रभरातील 288 जागांवरती पार पडणार आहे. आता राज्यभरात स्थानिक आणि राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारी द्या जाहीर होत आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याबाबत अर्जाची तारीख घोषित करण्यात आलेली आहे.

संपूर्ण राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींनी मोठा जोर धरलेला आहे. भारतीय जनता पक्षाने सर्वांपेक्षा आधी 28 ऑक्टोबर रोजी आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या यादीत मोठा बदल पाहायला मिळालेला आहे. या यादीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर मधील दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे तर चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मधून उमेदवारी भाजपने जाहीर केलेली आहे. भारतीय जनता पक्षाने या यादीमध्ये एकूण 99 उमेदवारांची नावे घोषित केलेली आहेत त्या 99 उमेदवारांमध्ये 13 महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री शिंदे या तारखेला अर्ज दाखल करतील..?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या 24 ऑक्टोंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून मैदानात उतरणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या पाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करण्याची घोषणा केलेली आहे. शिंदे गटाची उमेदवार यादी आज घोषित करण्यात येणार आहे. उमेदवार यादी जाहीर होण्याच्या पहिले उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख डिक्लेअर केलेली आहे. ठाण्यामध्ये 24 तारखेला वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येण्याची शक्यता आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहेत तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्या अगोदर मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणार आहेत.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">