भाजपला शरद पवारांचा गुप्त पाठिंबा? अजित पवार गटाच्या आमदारांचा खळबळजनक आरोप

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Vidhansabha election 2024 : विधानसभा निवडणुक तोंडावर आली असता संपूर्ण राज्यभरात नवनवीन घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. आणि या पश्च भूमीवर सगळ्यात राजकीय पक्षांच्या लोकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच शरद पवार आणि भाजप यांच्या बद्दल मोठे विधान अजित पवार गटाच्या आमदारांनी केलेलं आहे. याबद्दल पुढे जाणून घेऊया……

राज्यभरात विधानसभा निवडणुकीला मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे. अशातच सर्वीकडे बऱ्याचशा घडामोडी देखील घडत आहेत. महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून देखील ओळखला जातो. या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अनेक राजकीय घडामोडींना आता वेग आलेला दिसून येत आहे. भाजप शरद पवारांचा पाठिंबा घेत आहे. असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितलेलं आहे. भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेऊन वेगळे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न चालू आहे. शरद पवारांचा गुप्त पाठिंबा घेऊन माविकास आघाडीचा रणनीतिक उमेदवार उभा करायची खेळी चालू आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनाही सर्व काही सांगितलेलं आहे. तालुका व परदेश कार्यकारणी यांच्या समन्वय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझी उमेदवारी जाहीर करू नका असं मी सांगितलेलं आहे, सुनील शेळके म्हणाले.

आमदार सुनील शेळके काय म्हणाले….?

एकही उमेदवार महाविकास आघाडीचा मावळ मधून लढण्यास तयार नाही आहे. घटक पक्ष किंवा माविकास आघाडीतील नेते राष्ट्रवादीचा गुप्त पाठिंबा घेऊन उमेदवार देत आहेत. आणि वेगळी खेळी खेळण्यात येत आहे. भाजप नेत्यांचा यामागे हात आहे. असं आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे.

भाजप नेत्यांच्या धोरणावर प्रश्नचिन्ह

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी चांगलाच हल्लाबोल केलेला आहे. भाजप नेत्यांनी हे पहावं की आपला पक्षी एक संघ कसा राहील. आमच्यात लुडबुड आणि भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी महायुतीमध्ये तिढा निर्माण करण्याचं काम करत आहेत. काँग्रेस, शिवसेना, शरद पवार गट स्वतःचे चिन्ह घेऊन मावळ विधानसभेच्या मैदानात उतरू शकत नाही. यामुळे येथे महायुतीचा उमेदवार विजयी होईल. असं आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आल्यानंतर मी त्यांच्या सोबत फोनच्या माध्यमातून संवाद साधलेला आहे. आणि राष्ट्रवादीचे नेताजी पवार यांना मी समक्ष देखील भेटलो आहे. भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे. पदाधिकाऱ्याकडून महायुतीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम देखील केलं जातंय. भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी स्वतःचा पक्ष एकसंघ कसा राहील याकडे लक्ष द्यावे. असे आमदार सुनील शेळके म्हणाले आहेत.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">