Maharashtra election 2024 : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपलेली आहे. आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नव्हता पण आता आज बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली आहे. महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच चालू होती. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मध्यस्थी करून गाडे पुन्हा रुडावर आणलेलं आहे. महाविकास आघाडी मध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला होता. हा तनाव काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) आणि शिवसेना ठाकरे गटाचे परवक्ते राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) या दोघांच्या आक्रमक वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला होता. आता काँग्रेस हायकमांडने ज्येष्ठ नेते अनुभवी नेतृत्व बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे चर्चा समन्वय पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. आज पहिले सकाळी शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोचले आहेत.
काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे मुंबई येथे मातोश्री वर पोचल्यावर विधानसभा निवडणुकीचा महाविकास आघाडीचा एक संभाव्य फॉर्मुला समोर आलेला आहे. काँग्रेस पक्ष हा 110 जागांसाठी फॉर्मुला ठरलेला होता मात्र आज मातोश्रीवर चर्चेत पाच जागा कमी होऊ शकतात आणि काँग्रेससाठी 105 जागांचा फॉर्मुला ठरू शकतो. आणि शिवसेना ठाकरे गटाचा 90 जागांसाठी फॉर्म्युला ठरलेला होता. मात्र चर्चेनंतर फॉर्मुल्यामध्ये पाच जागांचा बदल होऊ शकतो. आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 75 जागांवर लढण्याचा फॉर्मुला आहे. आता चर्चेनंतर काय फॉर्मुला ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ज्या काही बाकी जागा कमी होणार असल्याचे चित्र समोर येत आहे ते म्हणजे महाविकास आघाडी मधील स्थानिक मित्र पक्षांचा महाविकास आघाडीने विचार केलेला आहे. आज दुपारी महाविकास आघाडीची बैठक होत आहे ही बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला होणार आहे या बैठकीनंतर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरू शकतो. आणि महाविकास आघाडी मधील नॅशनल काँग्रेस पार्टी, शिवसेना ठाकरे गट, शरदचंद्र पवार गट यांच्या उमेदवार याद्या लवकरच जाहीर करण्यात येतील.