एकनाथ शिंदे विरोधात मनसेने उमेदवार केला जाहीर, या हुकमी एक्काच्या नावावर शिक्कामोर्तब

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Maharashtra assembly election : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपलेली आहे. अशातच स्थानिक आणि राष्ट्रीय पक्ष यांचे उमेदवार जाहीर करण्याची तयारी पूर्ण झालेली दिसून येत आहे. आणि बाकी पक्षांचे काही उमेदवार जाहीर झालेले आहेत. या वर्षाच्या निवडणुकीत महाराष्ट्र मध्ये खूप मोठा धुराळा पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मनसे पक्ष, महायुती आणि महाविकास आघाडी बरोबर खूप ताकतीने मैदानात उतरलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील राज ठाकरे यांनी उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवली मध्ये सोमवारी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मनसेचा विश्वासू समजले जाणारे अविनाश जाधव यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे.ठाण्यातील पाचपाखाडी या मतदारसंघांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरतात. आणि मनसेने या शिंदे बालेकिल्ल्यात अविनाश जाधव यांना उमेदवारी घोषित केलेली आहे. मनसे कडून अविनाश जाधव यांची उमेदवारी फिक्स झालेली आहे. पण आता मनसे त्यांना ठाण्यामधून कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी देतात. हे आता याद्या आल्यावरच स्पष्ट होईल. ठाण्यात तिहरी लढत होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे अशी ही तिहरी लढत होऊ शकते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय म्हणाले

सोमवारी डोंबिवलीत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. मनसेची दुसरी यादी लवकरच जाहीर होईल. यादीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. परंतु आज मी आलोच आहे. तर राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करत आहे. तसेच येत्या 24 तारखेला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचा फॉर्म भरण्यासाठी मी येणार आहे. मला आठ वाजता मुंबईत पोहोचायचे आहे त्यामुळे मी आता जास्त काही बोलणार नाही. असं राज ठाकरेंनी सांगितले.

मनसे आमदार राजू पाटील

कल्याण ग्रामीण मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव आमदार विजय झाला होता. ते एकमेव आमदार राजू पाटील हे आहेत. आता पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता पुन्हा मनसेचे उमेदवार राजू पाटील विजय मिळू शकतील का. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">