महिला सक्षमीकरणासाठी धक्का: लाडकी बहीण योजना बंद, मंत्री म्हणाले आचारसंहितेचा प्रभाव

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Vidhansabha election 2024 and ladki bahin Yojana : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुकले गेले आहेत. महाराष्ट्र मध्ये या निवडणुकीदरम्यान सर्वात चर्चेचा विषय असलेली ‘लाडकी बहीण योजना’ या योजनेवर शिंदे सरकार मधल्या दोन मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि या निवडणुकीवर देखील त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये निवडणुकीच्या काळात चर्चेत असलेला विषय म्हणजे ‘माझी लाडकी बहीण योजना’ ही योजना शिंदे सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेच्या प्रभावामुळे महिला मतदारांवरती मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला दिसून येणार आहे. सत्ताधारी सरकारला या योजनेमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने थांबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य महिला आणि बालकल्याण विभागांनी योजना तात्पुरती थांबवलेली आहे. राज्यातील शिंदे सरकार यांच्याकडून महिलांना एक सोबत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे देण्यात आलेले आहेत. आता महिलांच्या खात्यात जमा होणारा हप्ता हा डिसेंबर मध्ये जमा होतो की नाही कारण निवडणुकीनंतर योजनेचे भवितव्य काय असतं हे पाहणं अत्यंत गरजेचे आहे. या योजनेवर विद्यमान सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दोन मंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्याचे नागरी व अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील या दोन जणांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ही लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया दिलेली आहे. ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मळाले नाहीत असे फार थोडेसे लोक राहिले आहेत. सगळ्यांचे पैसे अकाउंट मध्ये गेलेले आहेत 98% पेक्षा जास्त आमच्या महिला भगिनींना मिळाले आहेत. ही आमची कायमस्वरूपी योजना आहे. निवडणुकीसाठी आणलेली ही योजना नाही त्यामुळे याचा लाभ महिलांना मिळतच राहणार आहे. असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया…

निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेला स्थगिती दिल्याचं समजत आहे. या मुद्द्यावर विरोधक तुम्हाला फसवायचे काम करतील “लाडकी बहीण योजना” जुलै महिन्यात सुरू झाली. योजनेचा आता चौथा महिना चालू आहे. चार महिन्याचे 6000 रुपये मिळायला हवे होती. पण आमच्या भगिनींना साडेसात हजार रुपये मिळाले. जास्तीचे पंधराशे रुपये तुम्हाला पुढच्या महिन्याची दिलेले आहेत. असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">