IPL 2025: मुंबई इंडियन्सचा ऑप्शनआधी मोठा निर्णय, पुन्हा मोठी जबाबदारी या दिग्गजाकडे

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

IPL 2025 Mumbai Indians: मुंबई इंडियन्स ने भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या एकूण पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. इंडियन्सने गेल्या 2024 च्या हंगामातआधी कॅप्टन बदलला होता. आता देखील IPL 2025 च्या हंगामा आधी तसाच निर्णय मुंबई इंडियन्सने घेतला आहे.

IPL जगतातील सर्वात यशस्वी संघ मानला जाणारा मुंबई इंडियन्स यांच्याकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्स ने अठराव्या ऑप्शनच्या आधीच (2025) संघात मोठा बदल केलेला आहे. इंडियन्स ने पुन्हा एकदा मोठ्या पदावर दिग्गज खेळाडूंची पेर नियुक्ती केलेली आहे. मुंबई इंडियन्स ने आपल्या संघाच्या मुख्य प्रशिक्षण पदी श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बाबतची माहिती मुंबई इंडियन्स ने आपल्या सोशल मीडिया पेजवर दिलेली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी विकेटकीपर फलंदाज मार्क बाउचर यांची मागील हंगामा मध्ये इंडियन्स प्रीमियर लीग (आयपीएल) संघ मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. पण आता मुंबई इंडियन्स कडून महेला जयवर्धनेची इंडियन्सच्या प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेला जयवर्धने हे इंडियन्सचे 2017 ते 2022 त्यांनी मुंबई इंडियन्सचा हेड कोच म्हणून कारभार सांभाळलेला आहे. पुन्हा महेल जयवर्धने यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स कशा प्रकारे कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी

मागचा गेलेला हंगाम मुंबई इंडियन्स साठी निराशा जनक ठरला संघाने अपेक्षित कामगिरी न करता पडदेत सातत्याने पराभव स्वीकारले या अंगावर मुंबई इंडियन्सला 14 सामन्यात फक्त चार विजय मिळाले आणि ते गुंणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिले होते. खेळाडूच्या मुख्य संघाच्या कामगिरी सातत्याचा अभाव आणि दुखापतीमुळे संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

आता कर्णधारपदाची धुरा कोणाकडे

गेल्या हंगामामध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदी रोहित शर्मा च्या जागी हार्दिक पांड्या यांची नियुक्ती करण्यात आली होती. हार्दिक पांड्या यांनी अगोदर मुंबई इंडियन्सला सोडचिट्टी देत गुजरात टायटन्स च्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती आणि गुजरात टायटन्स ला पहिल्याच वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली पण मागच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स ने हार्दिक पांड्याला रिटर्न घेत टीम मॅनेजमेंटने कर्णधार पदाची जबाबदारी दिली होती. रोहित शर्माच्या जागी मागच्या आयपीएल सीझनमध्ये कर्णधारपदी हार्दिक पांड्याची वर्णी लागली होती त्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांनी  सोशल मीडिया च्या माध्यमातून काढला होता. आता इंडियन्सचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेले जवर्धने काय नवीन कामगिरी करून दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">