मुंबईकरांनो दक्षिण मुंबईमध्ये येण्यापूर्वी बातमी नक्की वाचा……?

By janshahi24news

Updated on:

Follow Us
---Advertisement---

मुंबई: मुंबईतील शिवाजी पार्क वरती घेण्यात येणारा दसरा मेळावा हा अनेक वर्षापासून चालत येणारी शिवसेनेची एक परंपरा आहे. आणि यावर्षीही शिवसेना ठाकरे गटाचा  दसरा मेळावा शिवाजी पार्क मध्ये घेण्यात येणार आहे. या पश्चिमेवर शिवाजी पार्क परिसरातील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे.

विधानसभा निवडणूक आता जवळ येऊन लागलेल्या आहेत. आज विजयादशमीचा सण आहे म्हणजे दसऱ्याचा सण. संपूर्ण राज्यभरात राजकीय मेळाव्या आणि सभा मोठ्या प्रमाणात होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे आज संध्याकाळी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा आणि शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कवर होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदान येथे होणार आहे. आज संध्याकाळी या मेळाव्यात दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून निवडणुकीच्या प्रचराचे रणसिंगे फुकले जातील. आणि आपापल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रचाराचे आव्हान करतील.

मुंबईमधील शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची वर्षांणूवर्ष चालून आलेली एक परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरील शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाल्याचे दिसून येते. सगळ्यांना उत्सुकता लागून आहे की आजच्या या दसरा मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे काय बोलतील आणि शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पण या दोन्ही मेळाव्यांच्या डोक्यावरती पावसाचे मोठे संकट आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय. आजही मुंबई शहरा मध्ये आणि उपनगरा मध्ये पाऊस पडण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवली जात आहे. पावसाचा असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जर पाऊस आलाच तर या दोघं मेळाव्यांचे काय होईल याकडे सर्वांची लक्ष लागून आहे.

आज दसऱ्यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानात त होत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा तिथे पार पडणार आहे. या दसरा मेळाव्याची पूर्वतयारी शिवाजी पार्क मैदानावर सुरू असून. अप्रतिम असा स्टेज आणि डेकोरेशन उभारण्यात आले आहे. मोठ्या संख्येने पुढच्या देखील मांडण्यात आलेले आहेत. जास्त पाऊस होत असल्यामुळे या मैदानात चिखलाचे साम्राज्य तयार झालेले पाहायला मिळतय. टिक टिक आणि पावसामुळे पाणी साचलेलं दिसून येतय. या दसरा मेळाव्याला महाराष्ट्रभरातून येणाऱ्या शिवसैनिकांना या परिस्थितीचा सामना करावा लागेल. आज संध्याकाळी या दसर मेळाव्यातून उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काय आव्हान करता आणि विरोधकांवर काय हल्लाबोल करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

या मेळाव्याच्या अनुषंगाने शिवसेना कोणाकडून शिवसैनिकांना आव्हान आणि मार्गदर्शन सूचना करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे या दसरा मेळाव्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आणि अन्न नियोजन तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याचे काटेकोरपणे पालन करून शिवसैनिक आणि प्रेमींनी पोलिसांना सहकार्य करावी अशी आव्हान  मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आले आहे तसेच वाहतुकीची व्यवस्था कशी असेल त्याच्याही सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">