झापूक झुपूक SQ,YQ,ZQ किंग…. बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर सुरज चव्हाणच पूर्ण आयुष्याचं बदललं

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Big boss Marathi 2024 winner Suraj Chavan: सोशल मीडिया रिअल स्टार सुरज चव्हाण यंदा 2024 बिग बॉस मराठी ची ट्रॉफी जिंकली. ट्रॉफी जिंकल्यानंतर रिअल स्टार सुरज चव्हाणांच्या आयुष्यात मोठा बदल घडून आलेला आहे. बिग बॉस मध्ये जाण्याआधीच रियल स्टार सुरज चव्हाण आणि आताचा रियल स्टार सुरज चव्हाण यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे.

सुरज चव्हाण हा बारामतीच्या मुळव्या गावातील एका सामान्य कुटुंबातील रहिवासी आहे. पहिले सोशल मीडियावर रियल स्टार म्हणून धुमाकूळ घालणारा सुरज चव्हाण आता संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आहे. बिग बॉस मराठी 2024 यावर्षीची ट्रॉफी सुरज चव्हाण यांनी जिंकली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील सुरज ते बिग बॉस मराठी ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याचं सामाजिक आणि राजकीय विविध क्षेत्रांमधून त्याचं कौतुक केलं जाते. बारामती मध्ये आणि त्याच्या मांडवे मोडवे गावात सुरतचं अतिउत्सहाने स्वागत करण्यात आले. सुरज चव्हाण ला बिग बॉस नंतर आता नव्या सिनेमाची ऑफर देखील मिळालेली आहे.

बिग बॉस मराठीचा २०२४ चे विजेते पदावर सुरज चव्हाण ने आपलं नाव कोरलं. बिग बॉस मराठी च्या घरामध्ये जेव्हा सुरज गेला तेव्हा त्याला काहीच माहित नव्हतं. पण त्याचा साधेपणा प्रेक्षकांना चांगलाच भावला आणि प्रेक्षकांनी चांगलेच त्याला सपोर्ट केले. सुरज बिग बॉस ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला पण त्याला एक नवीन ऑफर समोरून चालून आली दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुरज चव्हाण ला सिनेमाची ऑफर दिली आहे त्यांचा “झापूक झुपूक” हा सिनेमा केदार शिंदे तयार करत आहेत. सिनेमांमध्ये हिरो म्हणून सुरज चव्हाण दिसणार आहे. हा सिनेमा लवकरच 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

प्रेक्षकांचा या बाबींमुळे सुरज ला पाठिंबा 

“बिग बॉस मराठी” मध्ये यावर्षीच्या सीजनमध्ये मोठ मोठे दिग्गज कलाकार होते. पण सगळ्या कलाकारांमध्ये प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरला तो एका सर्वसामान्य कुटुंबातील सुरज चव्हाण. सुरत चा साधा घोळा पणा प्रेक्षकांच्या मनात आपलं घर करून गेला. सुरज ला काहीसा गेम पडत नसतानाही सुरत गेम मध्ये टिकून राहणं प्रेक्षकांच्या मनाला खूप आवडलं. सुरज चव्हाण एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्याने स्वतःला कधीही बदललं नाही. त्याचा हा साधा गोळा पणाच प्रेक्षकांच्या मनाला भावला. प्रेक्षकांनी सुरज ला भरभरून प्रतिसाद दिला. आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळेच सुरज ही ट्रॉफी जिंकू शकला. 

प्रवासाबद्दल स्वतः सूरज काय म्हणाला 

कलर्स मराठी ने सुरत चा एक व्हिडिओ शेअर केला आहे या सुरज मी बिग बॉस मराठी च्या घरातील त्याचा जीवनप्रवास सांगितला आहे. भावांनो तुमचा झापूक झुपूक किंग जिंकला की नाही बिग बॉस मराठी ची ट्रॉफी मी म्हणालो होतो मी जिंकणार आणि मी जिंकलो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जिंकलो असं सूरजने म्हटलं आहे…..

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">