Baba Siddique News:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या…

By janshahi24news

Updated on:

Follow Us
---Advertisement---

Baba Siddique News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. तीन तरुणांकडून हा गोळीपाड करण्यात आला असून या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी हे त्यांचे पुत्र आणि आमदार दिशान सिद्धी की यांच्या वांद्रे परिसरातील खेरनगर येथील कार्यालया जवळ थांबले होते यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला गोळीबारात जखमी झालेल्या सिद्दिकी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तीन तरुणांकडून हा गुढीपाड करण्यात आला असून बाबा सिद्दिकी यांना एक गोळी लागली होती. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून बाबा सिद्धी यांना मृत्यू घोषित केले. आणि बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून हत्या करणाऱ्या तीन जणांपैकी दोन जणांना मुंबई पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. आणि बाबा सिद्दिकी वरील झालेल्या गोळीबाराबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे.

बाबा सिद्दिकी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबईतील वरिष्ठ नेते होते. सिद्दिकी हे तीन वेळा आमदार राहिले आहेत फेब्रुवारीत सिद्दिकी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता. त्यांचा आज दसऱ्याच्या दिवशी गोडीबारामध्ये मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दिकी यांची प्रकृती अधिक गंभीर होती त्यांना मुंबई दिल्लीला उत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण तिथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा सिद्दिकी यांच्या छातीला गोळी लागली होती आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका सहकार्याला देखील पायाला गोळी. लागली होती. हा हल्ला दसऱ्याच्या दिवशी रात्री 9 वाजेच्या सुमारास झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाची अनेक नेते रुग्णालयात दाखल झाले होते आणि तिथे संजय दत्त देखील दाखल झाले होते. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचा आणि शिवसेना शिंदे गटाचा मुंबई दसरा मेळावा चालू असताना ही माहिती समोर आली आणि गर्दीमध्ये खडबड माजली.

शरद पवार काय म्हणाले…..?

देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत माझी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सोम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी डोक्याची घंटा करू शकते याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधार्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले……?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि त्या संदर्भात मी डॉक्टरांशी आधी बोललो होतो. आणि पोलीस आयुक्तांशीही बोललो होतो. दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यातील एक यूपीचा आहे आणि एक हरियाणाचा आहे. एक आरोपी फरार आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी पोलिसांना निर्देश दिलेले आहेत मुंबईमध्ये कोणीही कायदा सुव्यवस्था हाती घेता कामा नये. गॅंगवॉर वगैरे कोणी डोकं वर काढता कामा नये यांच्यावर कठोर कारवाई करा अशा सूचना दिलेल्या आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांवर कठोर कारवाई होईल असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">