अंगावर शहारे आणणारा शरद केळकरचा ‘रानटी’ टिझर रिलीज

By janshahi24news

Updated on:

Follow Us
---Advertisement---

‘रानटी” या मराठी अॅक्शन चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातल्या धगधगत्या अॅक्शन सीन्सने आणि जबरदस्त संवादांनी प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अॅक्शनची वेगळी ओळख निर्माण करणारा हा चित्रपट दिग्दर्शक समित कक्कड यांचा नवीन प्रयत्न आहे, आणि मुख्य भूमिकेत असलेले शरद केळकर या वेळी एका जबरदस्त भूमिकेत झळकणार आहेत.

शरद केळकर म्हटलं की आपल्याला बाहुबली चित्रपटातील त्याचा भारदस्त आवाज आठवतो. पण”रानटी” मधून तो स्वतःच एका बाहुबलीसारख्या दमदार भूमिकेत येत आहे. या चित्रपटात त्याचा रौद्र अवतार टिझरमध्येच दिसून येतो, ज्या पद्धतीने त्याची स्टाइल, संवादफेक, आणि अॅक्शन दाखवली गेली आहे, त्याने प्रेक्षकांना थक्क केले आहे. “अपून फूल ऑन डेंजर… डोन्ट टेक मी लाइट”, “मी तर तुफान आहे, म्हणून मी हिंसक झालोय” असे संवाद त्याच्या पात्राच्या उग्रतेला अधिक प्रभावशाली बनवतात.

दमदार कलाकार आणि प्रचंड अॅक्शन सीन्स

शरद केळकर याच्यासह या चित्रपटात संतोष जुवेकर, संजय नार्वेकर यांसारखे मराठी सिनेमातील नावाजलेले कलाकार आहेत, जे कथेला अजूनच रंगत आणतात.”रानटी” चित्रपट पुनीत बालन स्टुडिओद्वारे निर्मित आहे आणि त्याला मराठीतील सर्वात मोठा अॅक्शनपट म्हटलं जात आहे. टिझरमधील अॅक्शन सीन्स आणि संवाद पाहून त्याच्या भव्यतेचा अंदाज येतो. शरदच्या पात्राचा “विष्णू” नावाच्या धूर्त व्हिलनसोबतचा संघर्ष प्रेक्षकांना रोचक ठरणार आहे.

एक नव्या वळणाचा ड्रामा

“रानटी” हा चित्रपट केवळ अॅक्शनवर आधारित नाही, तर त्यात इमोशन आणि रोमान्सचा तडका देखील आहे. त्यामुळं या चित्रपटाची कथा भावनिक आणि अॅक्शनमध्ये संतुलन साधत पुढे जाते. शरदचा जबरदस्त अॅक्शन अवतार आणि त्याचं रौद्र रूप पाहणं प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. या भूमिकेत शरदला पाहताना त्याचा आक्रामकता आणि प्रखरता अंगावर येते.

जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांचं कौतुक

समित कक्कड यांचा हा चित्रपट इतका जबरदस्त आहे. की त्याचा टिझर सोशल मीडियावर जॅकी श्रॉफ आणि संजय दत्तसारख्या दिग्गजांनीही शेअर केला आहे. त्यांच्या पोस्टमुळं “रानटी” ची प्रसिद्धी वाढली आहे. आणि अधिकाधिक लोकांनी त्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.

तांत्रिक बाजू मजबूत

“रानटी” च्या टिझरमधून चित्रपटाची तांत्रिक ताकद स्पष्ट दिसते. हृषिकेश कोळी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे, अजित परब यांनी संगीत दिलं आहे, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, आणि सेतु श्रीराम यांचं प्रभावी छायाचित्रण यामुळे या चित्रपटाची तांत्रिक बाजू भक्कम झाली आहे.

रानटीं” च्या टिझरला प्रेक्षकांचं प्रेम

“”रानटी” च्या टिझरला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी टिझरवर कमेंट्स करत चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणि कौतुक व्यक्त केलं आहे. शरद केळकरला एका नवीन अंदाजात पाहणं, त्याच्या अॅक्शन स्टाईलमधील नवे प्रयोग पाहणं हे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक पर्वणी असणार आहे.

22 नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा अॅक्शनपट

22 नोव्हेंबरला “रानटी” प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, आणि मराठीतील या भव्य अॅक्शनपटाचं स्वागत करण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतील अॅक्शनचा नवाच अध्याय उलगडणार आहे, हे नक्कीच.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">