ऋषभ पंतला आयपीएल 2025 मध्ये कप्तान; बनवले जाणार नाही…?

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Rishabh pant you will not be made captain in IPL 2025: भारताचा उत्कृष्ट खेळाडू ऋषभ पंत ला 2025 आयपीएल सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल ची कप्तानी काढून घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. कारण दिल्ली कॅपिटल नवीन चांगल्या कर्णधाराच्या शोधात आहे.

दिल्ली कॅपिटल पुढील होणाऱ्या आय पी एल 2025 साठी टीम इंडियाचा उत्कृष्ट खेळाडू अक्षर पटेल यांची वर्णी लावू शकते. किंवा एखाद्या चांगल्या खेळाडूला आयपीएल ऑक्शन 2025 मध्ये बाय करून ही कर्णधार पदाची जबाबदारी त्या खेळाडूकडे दिल्ली कॅपिटल देऊ शकते.

ऋषभ पंत हा खेळाडू संघाला पुढे ठेवण्यासाठी उत्कृष्ट आहे. दिल्ली कॅपिटल या संघाला वाटतं की कर्णधार पदाचा दबाव नसताना पंत संघा मध्ये खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करतो.

दिल्ली कॅपिटल संघ 2020 मध्ये उत्कृष्ट फलंदाज श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या फेरीत पोचली होती. त्यांची या आयपीएलच्या स्पर्धेत सर्व उत्कृष्ट कामगिरी होती. आणि आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल प्ले ऑफ मध्ये पोचली होती.

ऋषभ पंत ला एका भीषण कार अपघातामुळे दीड वर्ष क्रिकेट या खेळापासून दूर राहावे लागले. आयपीएल च्या गेल्या हंगामात ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल या संघाची कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती आणि मागच्या हंगामामध्ये त्यांनी सहा सामने जिकले होते. आणि बाकीच्या सामन्य त्यांना गमवावे लागले होते लागले होते. आयपीएल ऑक्शन मध्ये फ्रेंचाईसाठी एक चांगला संभाव्य असा पर्याय, श्रेयस अय्यरला जरी कोलकत्ता नाईट रायडर्स ठेवले नाही. तर मग श्रेयस अय्यर यांची पुन्हा येत्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल या संघाच्या कर्णधार पदी वर्णी लागू शकते. श्रेयस अय्यर यांनी आपल्या उत्कृष्ट कप्तानीच्या जोरावर (कोलकत्ता नाईट रायडर्स) या संघाला विजेतेपद गेल्या हंगामात मिळून दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल च्या दोघं मालकांची भेट घेतली होती. मालक पार्थ जिंदाल आणि किरण कुमार गांधी यांच्याशी फ्रेंचाईजीच्या भविष्याबद्दल संवाद साधला होता.

दिल्ली कॅपिटल (Delhi capital) मागील काळात भारत आणि तामिळनाडूचे माजी उत्कृष्ट फलंदाज हेमांग बदानी (Hemang badani) यांची पुढील दोन हंगामांसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. आणि भारताचा माजी सहकारी वेणुगोपाल राव यांची क्रिकेट संघाचे संचालक म्हणून नियुक्ती केली.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">