राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती संदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

महाराष्ट्र मध्ये राज्यपालांकडून बारा विधान परिषद आमदार नियुक्त केले जातात या जागा मागील चार वर्षापासून रिक्त आहेत तरीदेखील राज्यपालांनी अजून पर्यंत बारा आमदारांची वर्णी लावलेली नाही आहे. त्यामुळे आता महायुती सरकारने राज्यपालांकडे सात आमदारांचा प्रस्ताव पाठवलेला आहे त्या प्रस्तावामध्ये भाजपचे तीन आमदार आणि शिवसेनेचे दोन आमदार राष्ट्रवादीचे दोन आमदार असे एकूण सात आमदारांची नाव आणि प्रस्ताव महायुतीकडून राज्यपालांकडे देण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात माहाविकास आघाडीचे सरकार असताना या रिक्त जागांवर आमदार नियुक्त करण्यासाठी त्यावेळी चे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे त्यावेळेसचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आमदार नियुक्तीची मागणी केली होती. पण भगतसिंग कोशारी यांनी त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे त्या जागा महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील रिक्तच राहिल्या उद्धव ठाकरे यांनी आमदार नियुक्तीसाठी कोर्टाकडे धाव घेतली होती कोर्टात आमदार नियुक्ती संदर्भात सुनावण्या चालू असताना महाविकास आघाडीचे त्यावेळेस सरकार कोसळले आणि महायुतीचे सरकार आले. आता महायुतीने राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. आता निवडणुकींना वेग आलेला आहे त्यामुळे सरकार कोणाचे येतं काय सांगता येत नाही म्हणून महायुतीकडून आमदार नियुक्तीच्या हालचाली सुरू करण्यात आलेले आहे.

आमदार नियुक्ती बाबतच प्रकरण महाविकास आघाडीचे सरकार असताना कोर्टात चालू होतं. पण तेव्हा महायुतीचे सरकार आलं आणि महायुतीने देखील आमदार नियुक्तीसाठी प्रयत्न केले आणि फार्मूला ठेवण्यात आला की भाजपला सहा आणि शिवसेना शिंदे गडाला तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तीन जागा हा फार्मूला ठेवण्यात आला होता पण आमदार नियुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे आता महायुती सरकारने निवडणुका जवळ असताना एक नवीन फॉर्मुला तीन दोन दोन असा तयार केलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीला तीन जागा शिवसेना शिंदे गटाला दोन जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन जागा अशा सात जागांवर आमदार नियुक्त करण्यात यावेत असा प्रस्ताव महायुती सरकारने राज्यपालांकडे पाठवलेला आहे. आता राज्यपाल याच्यावर काय निर्णय घेतात याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या जागा मागील चार वर्षापासून रिक्त पडलेले आहेत. त्यामुळे राज्यपाल आता काहीतरी निर्णय घेतील असं सर्वांना वाटत आहे. त्यामुळे आता याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

 

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">