Dhule : धुळ्यातील माजी आमदार अनिल गोटे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येत्या दोन दिवसात प्रवेश करणार आहेत. माजी आमदार अनिल गोटे हे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल गोटे यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अनिल गोटे यांचा स्वतःचा एक लोकसंग्राम म्हणून पक्ष आहे त्यांनी लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडी मधील काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता स्वतःचा लोकसंग्राम पक्ष न चालवता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत.
अनिल गोटे माध्यमांची काय बोलले?
माध्यमांशी संवाद साधताना माजी आमदार अनिल गोटे यांनी जाहीर केले की येत्या 24 ऑक्टोबरला मुंबई उद्धव ठाकरे याच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. अनिल गोटे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या संपर्कात होते असं सांगण्यात येत आहे. अनिल गोटे यांनी पक्षप्रवेशा बाबत माध्यमांशी बोलताना म्हणाले. की 24 तारखेला सकाळी मी ठाकरे गटात प्रवेश करतोय. मागच्या पंधरा दिवसापूर्वी संजय राऊत यांची चर्चा झाली होती कार्यकर्त्यांना विचारून हा निर्णय घेतला आमच्याकडे दोन पर्याय होते. एकतर स्वतंत्र लोकसंग्राम म्हणून निवडणूक लढवायची किंवा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करायचा. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निर्णयानंतर 24 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करतोय असं माझी आमदार अनिल गोटे यांनी जाहीर केले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी धुळे दौरा काही दिवसापूर्वीच केला होता. त्या दौऱ्या वेळी संजय राऊत आणि अनिल गोटे यांच्यामध्ये बंद दारा आड किमान अर्धा तास चर्चा झाली होती. त्या बंद दारा आडच्या चर्चेनंतर सर्वीकडे वाऱ्यासारखा पसरलं की अनिल गोटे हे शिवसेना ठाकरे गटाची धुळे शहर मतदारसंघातून उमेदवार असतील. पण धुळे शहर मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाकडे असल्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पक्षातले स्थानिक उमेदवारांना या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी धुळे शहरांमधून शिवसेना ठाकरे गटाकडून डॉक्टर सुशील महाजन आणि माजी आमदार प्रा. शरद पाटील हे दोन उमेदवार इच्छुक होते. पण आता लोकसंग्राम पक्षाचे अनिल गोटे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे आता धुळे शहरातून उमेदवारी कोणाला भेटेल. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
अनिल गोटे हे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून 3 वेळेस निवडून आलेले आहेत. 1999 मध्ये समाजवादी जनता पक्षाच्या तिकिटावर अनिल गोटे पहिल्यांदा निवडून आले होते. आणि त्यानंतर 2009 मध्ये स्वतःच्या लोकसंग्राम पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. आणि 2014 मध्ये भाजपात प्रवेश करून निवडून आले होते. मात्र त्यांनी 2019 मध्ये अपक्ष उमेदवारी केली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांनी 2019 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. पण पक्षाच्या स्थानिक वादामुळे ते राष्ट्रवादी मधून बाहेर पळाले आणि स्वतःचा लोकसंग्राम नावाचा पक्ष सांभाळला पण आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या धुळे शहर मतदार संघातून उमेदवारीसाठी शिवसेना ठाकरे गटात ते प्रवेश करणार आहेत. त्यांचा प्रवेश येत्या 24 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.