Assembly election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाची तयारी जोरात सुरू आहे, आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी ( Varud morshi ) विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत अनपेक्षित संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच मतदारसंघातून आता अजित पवार यांनी महत्त्वाची चाल खेळली आहे. अजित पवारांनी आपले निष्ठावान समर्थक देवेंद्र भुयार( Devendra Bhuyar ) यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी एबी फॉर्म प्रदान केला आहे. भुयार हे वरुड-मोर्शीचे विद्यमान आमदार आहेत, आणि यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातून अधिकृत उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत.
भुयार यांनी काही महिन्यांपूर्वीच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतरत्यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे येईल अशी शक्यता होती, परंतु भाजपने यावर आक्षेप घेतला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrakant bavankude ) यांनी या जागेवर पक्षाच्या उमेदवार उमेश यावलकर यांना संधी देण्याची मागणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वरुड-मोर्शी ( varud morshi ) मतदारसंघात उमेश यावलकर(Umesh yawalkar ) यांच्या प्रचाराची तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे महायुतीतून हा मतदारसंघकोणाच्या वाट्याला जाईल, याबाबत अजूनहीसाशंकता होती.
देवेंद्र भुयार ( Devendra Bhuyar ) हे आधी अपक्ष आमदार होते, परंतु त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर त्यांनी अपेक्षेने राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पहिल्या दोन उमेदवार यादीत त्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता, त्यामुळे ते नाराज होते. ते मुंबईत उमेदवारीसाठी काही दिवस थांबले आणि शेवटी जबाबदारी घेतल्या जात नसल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली. त्यांनी सोशल मीडियावर ‘उमेदवारी अर्ज भरायला चला’ असा संदेश दिला होता, ज्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे संकेत मिळाले.
शेवटी अजित पवार ( Ajit Pawar ) गटाने त्यांची नाराजी दूरकरण्यासाठी त्यांना वरुड-मोर्शी मतदारसंघासाठी एबी फॉर्म दिला, आणि देवेंद्र भुयार यांनी तातडीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली. भुयार यांच्या उमेदवारीमुळे वरुड-मोर्शी मतदारसंघात महायुतीत नवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यामतदारसंघात मित्रपक्षांमधील आपसी लढत होईल की हे वाद मिटतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अजित पवार यांच्या या खेळीने अमरावती जिल्ह्यातीलराजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झालीआहे. या राजकीय नाट्यात वरुड-मोर्शी मतदारसंघावरून महायुतीतील परिस्थितीचा ताण आणखी वाढू शकतो, आणि ही लढत स्थानिक पातळीवर महत्त्वाची ठरू शकते.