काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या घरावर गोळीबार झाली होती. त्यावेळेस देखील लॉरेन्स बिस्नोई यांचं नाव चर्चेत आल होतं. आणि आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्यानंतर लॉरेन्स बिश्नोई नाव चर्चेत आलेल आहे. बाबा सिद्दिकी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महिन्यापूर्वीच प्रवेश केला होता त्यांची शनिवारी रात्री बिश्नोई गॅंग कडून गोळ्या झाळून हत्या करण्यात आली. लॉरेन्सला खतरनाक गँगस्टर म्हणून ही ओळखलं जातं आणि लॉरेन्स बिस्नोई अकरा राज्य आणि सहा देशांमध्ये आपलं साम्राज्य चालवतो. लॉरेन्स बिश्नोई चे नाव अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये घेतलं जातं. जसे की खंडणी, खून आशा अनेक गंभीर गुन्ह्यांमधील लॉरेन्स बिस्नोई चे नाव समोर आलेलं आहे. लॉरेन्स बिश्नोई चा जन्म 12 फेब्रुवारी 1992 रोजी राजस्थान मधील फाजिल्का जिल्ह्यात एका बिश्नोई समाजाच्या कुटुंबात झाला बिश्नोई समाजाला पर्यावरण प्रेमी म्हणून देखील ओळखला जातो. पण लॉरेन्स ने गुन्हेगारीचा रस्ता पकडला.
शिक्षण
लॉरेन्स बिश्नोई शालेय शिक्षण चंदीगड मध्ये पूर्ण केले. खेळामध्ये सक्रिय आणि चांगलं विद्यार्थी असे लॉरेन्सची ओळख होती पण कॉलेजमध्ये असताना लॉरेन्स विद्यार्थी संघटनेच्या प्रवाहात आल्यानंतर. कॉलेजच्या निवडणुकीत उभा राहिला आणि पराभवानंतर लॉरेन्स ने वस्पा काढण्यासाठी बंदूक खरेदी करून 2011 मध्ये खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर गुन्हेगारी क्षेत्राकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली.
गुन्हेगारी प्रवास
लॉरेन्स बिश्नोई कॉलेजमध्ये असताना सुरुवातीच्या जीवनात राजकारणामुळे प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर लॉरेन्सने आपली स्वतःची एक गुन्हेगारी टोळी बनवली होती. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर लॉरेन्स चे नाव चांगले चर्चेत आले होते. कारण सिद्धू मूसेवाला यांच्या हत्ते नंतर लॉरेन्स बिस्नोई चे नाव जोडले गेले होते. त्याच्यावर अनेक प्रकारची खून खंडणी शस्त्रांचावापर अशे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
वादग्रस्त घटना
2018 मध्ये बॉलीवूडचे सुपरस्टार सलमान खान यांना ठार मारण्याची धमकी लॉरेन्सने दिली होती. त्यावेळी लॉरेन्स चे नाव राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेत आले होते. सलमान खान यांना बिश्नोई समाज काळवीट शिकार प्रकरणात दोशी समजतो. याच कारणामुळे लॉरेन्स ने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
लॉरेन्स बिश्नोई चे तुरुंगातील जीवन
लॉरेन्स बिश्नोई वरती अनेक मोठमोठे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो आता तुरुंगामध्ये आहे. तो तुरुंगा बाहेर येण्यासाठी कधीही जामिनी वगैरेचा प्रयत्न करत नाही. कारण त्याच्यासाठी तो सर्वात सुरक्षित जागा तुरुंगात समजतो लॉरेन्स तुरुंगामधूनच आपला संपूर्ण कारभार चालवतो. तो सोशल मीडियाच्या सहाय्याने तुरुंगामधून अकरा राज्य आणि सहा देशांमध्ये गॅंग चालवतो. लॉरेन्स बिश्नोई गुन्हेगारी कारणामुळे आणि समाजातील वर्तणुकीमुळे कायम चर्चेत दिसतो.
1 thought on “Lawrence Bishnoi history: 11 राज्य…. 6 देश किती मोठ आहे लॉरेन्स बिश्नोईच साम्राज्य…..?”