मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व टोलनाक्यांवरती टोल माफी देण्यात येणार आहे. टोल मातीची अंमलबजावणी आज रात्री बारा वाजेपासून शासनाकडून केली जाणार आहेत.
महाराष्ट्राचे विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. कारण आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळे आचार संहिता लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहिता ही आज किंवा उद्या मध्ये लागू शकते. त्यातच राज्य शासनाने एक मोठी घोषणा केली आहे अनेक दिवसापासून होत असलेल्या टोल माफीची मागणी अखेर सरकारने स्वीकारली आहे. आणि आज रात्री बारा वाजेपासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व टोलनाक्यांवर टोल माफी सरकारकडून देण्यात येणार आहे.
कोणत्या वाहनांना टोल माफी असणार आहे.
मुंबईमध्ये प्रवेश करणारे पाच टोलनाके आहेत या पाचही टोलनाक्यांवरती सरकारकडून टोल माफी दिली जाणार आहे. मुंबईतील वाशी, ऐरोली, दहिसर, आनंदनगर, आणि एलबीएस मुलूड या पाच टोलनाक्यांवरून सरकार टोलमाफी देणार आहे. मात्र हा नियम फक्त हलक्या वाहनांसाठी राहील. अटल सेतूसाठी ही हा नियम लागू केला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुंबईमध्ये टोल वसुली 2002 पासून केली जात आहे 1999 च्या आधी मुंबईत पन्नास उड्डाणपूल बनवण्यात आले होते त्या उड्डाणपुलांच्या खर्च वसुलीसाठी राज्य शासनाकडून टोल वसुलीचा निविदा काढण्यात आला होता राज्य सरकार मागच्या बावीस वर्षापासून टोल आकारात होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेली अनेक वर्ष टोलच्या मुद्द्यावरून आंदोलन केले आहेत. मुंबईत दिवसागणिक असंख्य वाहने ये-जा करत असतात त्यांना दिलासा द्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली होती त्याच मागणीला आज यश आले आहे. कारण मुंबईत येणाऱ्या पाचही टोलनाक्यावरून ये जा करणाऱ्या हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोलमाफी जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. गेली अनेक वर्ष टोलनाके विरोधात सुरू असलेल्या आमच्या लढ्याला आज यश आले उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. हा निर्णय निवडणुकीपुरतां न ठेवता कायम असावा नाहीतर निवडणुकीच्या नंतर त्यांचा बोजा जनतेच्या माती येईल.
सरकारच्या शेवटची बैठक
आज मंत्रिमंडळाची शेवटची बैठक आज मंत्रिमंडळाच्या या अंतिम बैठकीत काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आज शेवटची बैठक असल्यामुळे मंत्रालयाबाहेर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे कारण आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. पत्रकार परिषद कधीही लागू शकते. त्यामुळे आज राज्य मंत्रिमंडळात आचारसहिता पूर्वी कोणकोणते विषय मार्गी लागतात याकडे लक्ष लागून आहे.