Chalisgaon Ranjangaon Wedding : हेलिकॉप्टरमधून नवरीला घेऊन जाणारा नवरदेव बनला चर्चेचा विषय

By janshahi24news

Published on:

Follow Us
Chalisgaon Ranjangaon Wedding
---Advertisement---

Chalisgaon Ranjangaon Wedding : हौसेला मोल नसतं, असं म्हणतात आणि त्याचा प्रत्यय चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे पाहायला मिळाला. या गावात झालेल्या एका हटके विवाह सोहळ्याने संपूर्ण परिसरात चर्चा रंगली. लग्न म्हटलं की प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील या खास दिवसाला अविस्मरणीय बनवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना राबवतो. मात्र, या लग्नाने त्या सगळ्या कल्पनांवर कळस चढवला. नवरदेवाने आपल्या नववधूसाठी खास सरप्राइज देत चक्क हेलिकॉप्टरने तिला घरी नेलं.

Chalisgaon Ranjangaon Wedding

चाळीसगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी भिकन रामचंद्र परदेशी यांच्या नात प्रियाचा विवाह कोदगाव चौफुली येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. प्रियाचा वर छत्रपती देविसिंग ठाकूर यांचा चिरंजीव चेतन ठाकूर. लग्नसोहळ्याची तयारी आणि साजरीकरण तर नेहमीप्रमाणेच भव्य होती, पण जेव्हा नवऱ्याने नवरीसाठी हेलिकॉप्टर आणलं, तेव्हा सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडलं.

Chalisgaon Ranjangaon Wedding

गावात पहिल्यांदाच असा अनोखा सोहळा पाहायला मिळाला. लग्नानंतर नवरदेव चेतनने आपल्या नववधू प्रियाला घेऊन जाण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरच बोलावलं होतं. हे हेलिकॉप्टर संभाजीनगर येथील एका व्यावसायिकाने उपलब्ध करून दिलं होतं. गावकऱ्यांसाठी ही अनोखी घटना होती, कारण हेलिकॉप्टरसोबत जोडलेला लग्नसोहळा त्यांनी कधीही पाहिला नव्हता.

नवरीला निरोप देण्यासाठी संपूर्ण रांजणगावकर हेलिपॅडवर जमले होते. मुलीला निरोप देताना सर्वत्र आनंद आणि कौतुकाचे वातावरण होतं. प्रियाला आपल्या पतीसोबत हेलिकॉप्टरमध्ये बसताना पाहून तिच्या कुटुंबीय आणि गावकऱ्यांना प्रचंड अभिमान वाटत होता. हेलिकॉप्टर उड्डाण करत असताना अनेकांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

चेतनने हा खास सरप्राइज आपल्यासाठी ठेवला आहे, हे प्रियाला माहिती नव्हतं. पण हा अनोखा अनुभव तिच्यासाठी आयुष्यभर अविस्मरणीय ठरणार आहे. गावकरीही या अनोख्या घटनेबद्दल भारावून गेले होते. आपल्या गावातील लग्नाला असा अनोखा स्पर्श मिळाल्याने त्यांना अभिमान वाटत होता.

या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण गाव हजर होतं. लग्नसोहळा संपल्यानंतरही याची चर्चा गावात सुरूच होती. प्रियाच्या माहेर आणि सासरच्या लोकांनी या सोहळ्याचा आनंद घेत, नवविवाहित जोडीला सुखी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हौसेचा हा सोहळा केवळ रांजणगावच नाही, तर संपूर्ण परिसरातील लोकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. नवऱ्याने आपल्या नववधूला दिलेलं हे अनोखं सरप्राइज आयुष्यभरासाठी त्यांच्या आठवणीत कोरलं जाईल, यात शंका नाही.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">