Business Man Ratan Tata Death: रतन टाटा यांनी सोमवारी 7 तारखेला सांगितले त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासारखे काहीच नव्हते आणि वयाशी संबंधित असलेल्यां समस्यांसाठी त्यांची तपासणी करण्यात येत होती. ते म्हणाले होते, ‘वयाशी संबंधित आजारांमुळे माझी सध्या आरोग्य तपासणी सुरू आहे…
वयाच्या ८६ व्या वर्षी बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने उद्योगपतींपासून मनोरंजन, राजकारण, सामाजिक आणि क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. गुरुवारी त्यांचे पार्थिव श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एनसीपीए येथे ठेवण्यात येणार आहे.
टाटा यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘त्यांचा भाऊ, बहीण आणि कुटुंबीयांना ज्यांनी त्यांचा आदर केला त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेम, आदर आणि समानाने आम्ही समाधानी आहोत. रतन टाटा यापुढे व्यक्तिशः आपल्यात नसले तरी त्यांचा नम्रता, औदार्य आणि हेतू यांचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी एका निवेदनात रतन टाटा यांचे ‘मित्र आणि मार्गदर्शक’ असे वर्णन केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलंय टाटा यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र आणि झारखंड सरकारने एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. राज्यातील सर्व मनोरंजन आणि उत्सवाचे कार्यक्रम रद्द राहतील. तसेच, रतन टाटा यांचे पार्थिव दर्शनासाठी सकाळी १० ते दुपारी ३.३० या वेळेत NCPA येथे ठेवण्यात येणार आहे.