आता शरद पवार कोणाला उमेदवारी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पवारांच्या निर्णयावरच बारामतीची निवडणूक कशी आकार घेईल, हे ठरणार आहे. अजित पवारांसाठी ही निवडणूक सोपी नसणार, कारण यावेळी त्यांच्याच काकांनी त्यांना आव्हान दिलं आहे.
यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य ठरवणारी असेल. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर, पहिल्यांदाच ही निवडणूक होत असल्याने लोकांचा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल, हे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फूटीनंतर, बारामती हा आता सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ बनला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संघर्षाची झलक यावेळी बारामतीत दिसणार आहे.
अजित पवार यांच्या विरोधात शरद पवारांनी त्यांच्या पुतण्याला, युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे काका-पुतण्यांची ही थेट लढत रंगणार आहे. युगेंद्र पवार यांना उमेदवारीसाठी एबी फॉर्म दिला गेल्याची चर्चा आहे, आणि त्यामुळे बारामतीत एक महत्त्वाची राजकीय लढत होणार आहे.
अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ‘बारामती कोणाची?’ हा प्रश्न राजकीय चर्चेत आला आहे. यावेळी, शरद पवार यांनी एक तरुण आणि नवा चेहरा लोकांसमोर आणण्याचं ठरवलं आहे. युगेंद्र पवार या निवडणुकीत कसा परफॉर्म करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यापूर्वी अजित पवारांसाठी बारामतीची लढाई सोपी होती, कारण त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार नव्हता. मात्र यंदा त्यांच्याच काकांनी आणि राजकीय मार्गदर्शकांनी त्यांना आव्हान दिलं आहे, ज्यामुळे ही निवडणूक बारामतीसाठी निर्णायक ठरणार आहे.
बारामतीतील ही निवडणूक काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यातील संघर्षाचं प्रतीक ठरणार आहे. शरद पवारांनी दिलेला नवा चेहरा, लोकांच्या मनात स्थान निर्माण करू शकतो का, हे पाहणं औत्सुक्याचं आहे. या निवडणुकीत कोण विजयी होईल आणि बारामतीवर कोणाचं वर्चस्व राहील, हे पाहण्यासाठी संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघावर असेल.
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी बारामती मधून बहिणी विरोधात पत्नीला उमेदवारी देऊन उभं केलं होतं. पण बहीण सुप्रिया सुळे यांनी लोकसभेला बारामतीचा गड कायम राखला आणि अजित पवारांच्या पत्नीचा पराभव केला. मात्र आता विधानसभेला अजित पवार आपला बारामती मध्ये गड कायम राखू शकतील का. कारण त्यांना आता त्यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.
शरद पवारांनी दिलेल्या तरुण चेहऱ्याने लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं, तर बारामतीचं राजकीय समीकरण बदलू शकतं. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील, हे निश्चित.