Baba Siddique : सिद्दिकी हत्या प्रकरणात 5 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोंबर रोजी गोळ्या झाळून हत्या करण्यात आली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा जोराने तपास केला जात आहे. पोलिसांकडून विविध माध्यमातून बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणेचा तपास कसून केला जातोय. याप्रकरणी लॉरेन्स बिस्नोई गॅंग संदर्भातील सर्व माध्यमातून तपास सुरू आहे. पोलिसांकडून याप्रकरणी जोराने तपास केला जातोय. पोलिसांनी या प्रकरणातील 5 आरोपींना आज अटक केलेली आहे. या पाच आरोपींची नावे नितीन सप्रे, संभाजी पारधी, राम कनोजिया, प्रदीप ठोंबरे, चेतन पारधी अशी पाच आरोपींची नावं आहेत. या पाच आरोपींपैकी नितीन सप्रे आणि प्रदीप कनोजिया हे प्रमुख आहेत. याच आरोपींनी गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना बाबा सिद्धीकिच्या हत्येसाठी वापरलेल्या बंदुका पुरवल्या होत्या. पोलिसांनी पनवेल आणि कर्जत येथून 4 आरोपींना तर एका आरोपीला डोंबिवली येथून ताब्यात घेतले आहे. मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाचा होता असं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपी लॉरेन्स बिस्मिल गँगच्या संपर्कात होते. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री बाबत सिद्दिकी यांच्या हत्यानंतर त्यांचे चिरंजीव झिशान सिद्दिकी यांनी मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे. आपल्याला उत्तरे जरूर मिळतील. जेव्हा मला उत्तर मिळेल तेव्हा मी तुम्हाला उत्तर देईल. आम्हाला न्याय नक्की हवा आहे. मला माहिती आहे. की मला न्याय नक्की मिळेल. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस आयुक्त हे सर्वजण काम करत आहेत. अशी प्रक्रिया झिशान सिद्धीकी यांनी दिली आहे.

बाबा सिद्धी यांच्या हत्येमागे कारण काय असू शकतो.. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हाधरून गेलेलं आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर 12 ऑक्टोबरला तीन जणांकडून गोळीबार करण्यात आला होता. आणि त्यांचा त्या गोळीबार मृत्यू झाला. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई घेतली होती. असं स्वतः बिस्नोई गॅंग कडून सोशल मीडियावर पोस्ट करत कबुली देण्यात आली होती. बाबा सिद्धीकि हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यमंत्री होते. त्यांना काही दिवसांपूर्वी धमकी आली होती. त्यांनी त्यानंतर शासनाकडे सुरक्षेची मागणी केली होती पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं. या घटनेनंतर सगळीकडे मोठी खळबळ उडालेली दिसून येत आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">