बाबा सिद्दिकी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय राजकारणातील सुप्रसिद्ध असे व्यक्ति होते. त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास हा मुंबई शहराशी आणि स्थानिक राजकारणाशी जोडलेला आहे.
बाबा सिद्दिकी यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली होती. ते एक काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ही ओळखले जायचे त्यांचा राजकीय प्रभाव मुंबईच्या पश्चिम उपनगरात बांद्रा परिसरात खूप मजबूत होता. बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्र विधानसभेचे तीन वेळेस सदस्य आणि मुंबईतील बांद्रा पश्चिम मतदार संघाचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2004 सली महाराष्ट्र राज्याचे मंत्रिपदावर विराजमान झाले होते त्यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
बाबा सिद्दिकी यांचा जनसंपर्क खूप मजबूत होता त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम आणि प्रकल्प राबवले होते. त्यांना आपल्या राजकीय जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागला पण त्यांनी आपल्या भूमिका ठामपणे मांडले आणि राजकीय जीवनाची वाटचाल चालू ठेवली. बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील वार्षिक इफ्तार पार्टी एक सुप्रसिद्ध सामाजिक कार्यक्रम आहे या इतर पार्टीला राजकीय सामाजिक आणि बॉलीवूड अशा अनेक क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात लोक हजेरी लावतात. त्यांच्या या कार्यक्रमाला आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी आणि विविध क्षेत्रातील लोकांची संबंध मजबूत करण्यासाठी ओळखला जातो.
बाबा सिद्दिकी हे मुंबईतील काँग्रेसचे अनेक वर्षापासून एक निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते होते. पण त्यांनी काही दिवसापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला होता. पण त्यांची काल रात्री दसऱ्याच्या दिवशी रात्री नऊ वाजता गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या या हत्तीचा कट एक महिन्या पूर्वीच रचण्यात आला होता अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे ज्या तरुणांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली त्यांच्यामधून दोन तरुणांना ताब्यात घेतलेला आहे. ते तरुण मागच्या दोन महिन्यापासून मुंबईतील कुर्ला येथे राहत होते पोलीस आता त्या तरुणांना मदत करणाऱ्या व्यक्तीचा तपास करत आहेत.