भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या पहिल्या यादीमध्ये भाजपकडून एकूण 99 उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी आलेली आहे. भारतीय जनता पक्षाकडून विधानसभेची पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजपकडून या पहिल्या उमेदवारी यादीमध्ये एकूण 99 उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. आणि कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट यावेळी भाजपकडून कापण्यात आलेला आहे. आणि त्यांच्या जागी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलेला आहे. या यादीमध्ये भाजपने बऱ्याचशा महिलांना देखील तिकीट जाहीर केलेल आहे.
भाजपने किती महिलांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे?
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोराने वेग आला असतानाच भाजपने आज उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. त्या यादीमध्ये 99 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. या जाहीर झालेल्या 99 उमेदवारांची यादी मध्ये तेरा महिलांना देखील तेरा विधानसभा मतदारसंघाचे तिकीट देण्यात आलेले आहेत. भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेल्या महिला उमेदवारांची लिस्ट खालील प्रमाणे आहे.
चिखली मतदारसंघातून – श्वेता विद्याधर महाले
भोकर मतदारसंघातून – भाजप नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण
जितुर मतदारसंघातून – मेघना बोर्डीकर
फुलंब्री मतदारसंघातून – अनुराधबाई अतुल चव्हाण
नाशिक पश्चिम मतदारसंघातून – सीमाताई महेश हिरे
कल्याण पूर्व मतदारसंघतून – सुलभा गायकवाड
बेलापूर मतदारसंघातून – मंदा म्हात्रे
दहिसर मतदारसंघातून – मनीषा चौधरी
गोरेगाव मतदारसंघातून – विद्या ठाकूर
पर्वती मतदारसंघातून – माधुरी सतीश मिसाळ
शेवगाव मतदारसंघातून – मोनिका राजीव राजळे
श्रीगोंदा मतदारसंघातून – प्रतिभा पाचपुते
केतन मतदारसंघांतून – नमिता मुंदडा
भोकर मधून माजी उपमुख्यमंत्र्यांच्या मुलीला संधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघांमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि भाजपमध्ये गेल्यानंतर अशोक चव्हाण राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले आणि आता त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना देखील भारतीय जनता पक्षाकडून भोकर या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. दुसरी उमेदवार यादी देखील लवकरच येण्याची शक्यता आहे.