राज्यभरात केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर केलेले आहेत. निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच मविकास आघाडीमध्ये मोठी खलबल चाललेली आहे. त्यातच काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण झालेला आहे. शिवसेना ठाकरे गट विदर्भामधील 4 जागांची मागणी करत आहे. यावरूनच शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते नाना पटोले यांच्या कडून एकमेकांवर पलटवार करण्यात आले होते. आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरात रविवारी मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून आलेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री वरती एक तातडीची बैठक बोलावली होती. त्यानंतर असं समजलं की शिवसेना ठाकरे गट संपूर्ण राज्यभरात 288 जागा वरती निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे अशी माहिती समोर आली होती. आज संजय राऊत यांचा प्रसार माध्यमांशी बोलताना विनम्रपणा त्यांच्या बोलण्यातून दिसून आला त्यांनी सांगितलं की आम्ही मविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवणार आहोत.
आता सूत्रांकडून माहिती समोर येत आहे की काँग्रेस सोबळावर लढणार असल्याचा बोलले जात आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे. आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची देखील गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलणं झालं असल्यास सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस देखील आक्रमक होताना दिसून येत आहे.
मुंबईतील काही जागांवरून शिवसेना ठाकरे गटांमध्ये आणि काँग्रेस या दोघांमध्ये वाद निर्माण झालेला आहे. अशातच आता काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे आणि संजय राऊत यांनी भाजपची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलणं केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि आणखीन एक मोठा दावा काँग्रेस सूत्रांकडून करण्यात आलेला आहे की ठाकरे गट संपूर्ण 288 जागा लढवण्याचा पूर्ण विचार करणार आहे. जर ठाकरेंनी असे केलं तर संपूर्ण सहानुभूती शरद पवार गटाकडे आणि काँग्रेसकडे राहील.
जर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा जागा वाटपाचा टिळा जरी लवकर सुटला नाही तर याचा फटका तीनही पक्षांना निवडणूकीत बसताना दिसून येणार आहे. आणि या तिन्ही पक्षांमध्ये एकही पक्ष वेगळा झाला तर याचा परिणाम तिन्ही पक्षांवर होईल. आता काँग्रेस नेत्यांची दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची चर्चा चालू आहेत. आता या चर्चांमधून काय मध्यस्थी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.