5 crore case Pune news : महाराष्ट्र मध्ये आता विधानसभा निवडणुकीला वेग आला असतांनाच. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आचारसहिता लागलेली आहे. त्यामुळे सर्वीकडे पोलिस बारीक ने लक्ष ठेवून आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे आचारसहिता लागली असतानाच पुण्यामध्ये खेड शिवापुर परिसरात एका गाडीमधून तब्बल पाच कोटीची रोख रक्कम जप्त करण्यात आलेले आहे. आता सगळीकडे चर्चा रंगलेली आहे. की हा पाच कोटी रुपयाचा मुद्देमाल कोणाचा. यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून या संदर्भातील ट्विट करण्यात आलेल आहे.
प्रसारमाध्यमांचा एक व्हिडिओ ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये पाच कोटी सापडलेली गाडी एका मोठ्या नेत्यांशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि ती कारवाई खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेली आहे. निवडणूक काळात लागलेल्या पोलीस नाकाबंदी कार मध्ये सापडली 5 करोड कॅश रोख रक्कम सापडलेली गाडी सांगोल्याची असल्याचं त्यात सांगण्यात येत आहे.
संजय राऊत यांनी केलेलं ट्विट
मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेळ शिवापुर टोल नाक्यावर पंधरा कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर… मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले 15 कोटीचा हा पहिला हप्ता! काय बापू.. किती हे खोके? असे ट्विट ठाकरे गडाचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे.
मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले!
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 21, 2024
हे आमदार कोण?
काय झाडी…
काय डोंगर….
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले
१५ कोटी चा हा पहिला हप्ता!
काय बापू..
किती हे खोके?
@ECISVEEP
@AmitShah
pic.twitter.com/tb7DuPWV3W
हे सर्व कसं घडलं
खेड शिवापुर टोलनाक्यावरती नाकाबंदी दरम्यान पकडलेली. ईनवा क्रिस्टा ही गाडी आहे.MH.45.AS.2526 असा हा नंबर आहे. आणि ही गाडी सांगोल्याची आहे. नलवडे नावाच्या व्यक्तीच्या मालकीची ही गाडी आहे. आणि या गाडीतून तब्बल 5 कोटी रुपयांची रक्कम सांगोल्याला नेण्यात येत होती. आणि ही रक्कम सांगोल्या मधल्या एका मोठ्या नेत्याच्या जो सत्ताधारी पक्षाचा आहे. त्याच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आलेली आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये आता पुणे ग्रामीण पोलीस गुन्हा दाखल करण्याचं काम करत आहेत. निवडणूक आयोगाची अधिकारी देखील पोलिसांबरोबर त्याठिकाणी उपस्थित आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच ही रक्कम कोणाची आहे. आणि कुठे नेण्यात येत होती याचा तपास पुणे पोलीस लावतील. आणि स्पष्ट झाल्यावर पुणे पोलीस त्यांच्यावरील गुन्हा दाखल करतील.