राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मतदारसंघ आणि उमेदवार ठरले? संभाव्य उमेदवारांची यादी?

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. आणि राज्यातील दोन्ही आघाडीचे जागा वाटप जवळपास ठरलेला आहे. आता राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत की कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार. अशी माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची संभाव्य उमेदवार असलेली यादी लागलेली आहे. त्या यादीमध्ये कोणत्या मतदारसंघातून कोणते उमेदवार निवडणुक लढणार. या सदर्भातील यादी समोर आलेली आहे. समोर आलेल्या या संभाव्य उमेदवारी यादीमध्ये 40 पेक्षा जास्त जागांवर शरद पवार कोणाला उमेदवारी देणार आहेत या संदर्भातील संभाव्य उमेदवारी यादी आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी

इस्लामपूर – जयंत पाटील

तासगाव कवठे महांकाळ – रोहित पाटील

शिराळा – मानसिंग नाईक

उत्तर कराड – बाळासाहेब पाटील

कोरेगाव – शशिकांत शिंदे

फलटण – दीपक चव्हाण

मान खटाव -प्रभाकर देशमुख

शिरूर – अशोक पवार

जुन्नर – सत्यशील शेरकर

इंदापूर – हर्षवर्धन पाटील

आंबेगाव – देवदत्त निकम

वडगाव शेरी – बापू पठारे

दौंड – रमेश आप्पा थोरात

माळशिरस – उत्तमराव जानकर

कर्जत जामखेड – रोहित पवार

काटोल – अनिल देशमुख

विक्रमगड – सुनील भुसारा

घनसावंगी – राजेश टोपे

बीड – संदीप क्षीरसागर

मुब्रा – जितेंद्र आव्हाड

जितुर – विजय भांबळे

अहेरी – भाग्यश्री अत्राम

सिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणे

उदगीर – सुधाकर भालेराव

घाटकोपर पूर्व – राखी जाधव

परडी – राजाभाऊ पण

गेवराई – लक्ष्मण पवार

आष्टी – भीमराव धोंडे

केज – पृथ्वीराज साठे

माजलगाव – रमेश आडसकर

राहुरी – प्राजक तनपुरे

देवळाली – योगेश घोलप

दिंडोरी – गोकुळ झिरवाड

मुक्ताईनगर – रोहिणी खडसे

जामनेर – गुलाबराव देवकर

अकोला – अनिल भांगरे

पारनेर – राणी लंके

खानापूर – सदाशिव पाटील

चंदगड – नंदाताई बाबुळकर

इचलकरंजी – मदन कारंडे

शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये विदर्भातील जागा वाटपावरून वाद निर्माण झालेला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोघांमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जागावाटपची यादी आज जाहीर होणार होती. मात्र ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या वादामुळे शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी यादी पुढे ढकलण्यात आलेली आहे.

 

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">